• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल द्यावा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in शेती, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
rain-affected-area-akola
26
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला,दि.११ – रविवार दि.१० रोजी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात झालेला अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीटीमुळे फळबाग व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ करुन अहवाल द्यावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले आहेत.
रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला. त्यात अकोट तालुक्यातील अकोल खेड व पणज मंडळात गारपीटीने संत्रा व केळी बागांचे तसेच कांदा, गहू व काही ठिकाणी भुईमुग या पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाल्याची माहिती आहे. कृषि विभागाने काल दुपारीच दोन तास आधी स्कायमेट संस्थेकडून आलेला संदेश शेतकऱ्यांना पाठवला होता. त्यानंतर लगेचच दुपारी चार वाजेच्या सुमारास गारपीट व विजा व जोरदार वाऱ्यांसह पावसास सुरुवात झाली. या पावसानंतर निर्माण झालेली शेतावरील परिस्थिती शेतकऱ्यांनीही कृषि विभागाकडे मोबाईलद्वारे कळविली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी यांना तात्काळ पाहणी करुन प्राथमिक अहवाल पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी फळबाग विमा योजनेचे संरक्षण घेतले असेल त्यांच्याबाबत विमा कंपन्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच कांदा, भुईमुग व गहू या पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाले असल्यास स्वतंत्र पंचनामे करावे तसेच विमा संरक्षण असल्यास पंचनामे विमा कंपन्यांनी तात्काळ करावे असे आदेश कृषि विभागाने दिले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले.
दरम्यान आज दिवसभर नुकसानग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानीचे संयुक्त पंचनामे सादर करावे असे निर्देश कृषि विभागाने दिले आहेत. याबाबत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून सर्व संबंधित यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त पंचनामे करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
१६९५ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज
दरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या पाऊस व गारपीटीमुळे अकोट तालुक्यातील पाऊस व गारपीटग्रस्त गावांमधील १६९५ हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात केळी ५७५ हेक्टर, संत्रा बाग ८५० हेक्टर, लिंबू ९५ हेक्टर, कांदा ७५ हेक्टर, उन्हाळी भुईमुग ८० हेक्टर, भाजीपाला २० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे. या नुकसानीत अकोट तालुक्यातील दहा गावातील संत्रा,केळी, लिंबु, कांदा, भुईमुग या पिकांचा समावेश आहे, असेही कळविण्यात आले आहे.
नुकसानग्रस्त गावात अकोलखेड मंडळ मधील अकोलखेड,आंबोडा, मोहाला, धारुळ रामापूर, सुकली, राहणापुर, शहानूर, मलकापूर, पोपटखेड, आमोणा, केलपाणी,गुल्ललघाट,सोमठाणा,कोहा,कुंड,बोरी इ. १८ गावांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Tags: bacchu kadurain in akolasudden hailstorm akola
Previous Post

प्रभावित भागात सर्वेक्षण व चाचण्यांचा वेग वाढवा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

अल्पावधितच विदर्भात पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तयार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
vovid-care-center-nagpur-2

अल्पावधितच विदर्भात पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तयार

police raid gambling

ब्रेकिंग-उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची तेल्हाऱ्यात जुगारावर धाड,११ जुगारिंना रंगेहाथ पकडले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.