हिवरखेड (प्रतिनिधी)- आज कोरोना आजार सर्वत्र असताना सर्वात जास्त कुणी सेवा करत असतील तर ती पोलीस यंत्रणा,आरोग्य यंत्रणा,यामध्ये पोलीस यंत्रणा कडक ऊन्हात सुध्या आपली सेवा अत्यंत पारदर्शक पणे सांभाळत आहे.यांचे निमित्य साधुन आदित्य अनघा या संस्थेने आज हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस लोकांना Glucon-D चे वाटप व त्यांना उन्हापासून स्वरक्षण व्हावे याकरिता कॉनॉपी देण्यात आली. ग्लुकोन-डी चे वाटप केले.यावेळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.लव्हंगळे साहेब उपस्तीत होते.तसेच आदित्य अनघा बँकेचे चे शाखाधिकारी श्री.निलेश म्हसाळ,कर्मचारी श्री.निलेश मानकर,श्री.तुषार देशमुख,श्री अभिषेक नाईक यांनी संस्थेच्या वतीने वाटप केले.