अकोला – वक्तृत्व शैलीच्या जोरावर ‘मिटकरी’ या आडनावाला देशभरात ओळख निर्माण करून देण्याचं कार्य करणाऱ्या ‘अमोल मिटकरीनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला निवडणुकीत विक्रमी जाहीरसभा घेऊन जीवाचे रान केले त्याची फलश्रुती म्हणजे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली.
अमोल मिटकरीच्या कामाचे कौतुक खुद्द शरदचंद्र पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले तर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ‘अमोल मिटकरीना आमदार करणारच’! या एका वाक्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.त्यामुळे आता शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पहायला मिळणार असल्याने राजकारणाचा गंधही नसलेल्या कुटुंबाची विधानपरिषदेत होणारी “एन्ट्री” मोठा विचार मांडणारी ठरेल.
विधानपरिषदेचा 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अकोला जिल्ह्यातील अमोल मिटकरी यांचे नाव निश्चित झाले आहे.
कुटासा सारख्या छोट्याशा गावातील शेतकरी पुत्राला राष्ट्रवादीचा आमदार होण्याची संधी इतिहासनिर्माण करेल .ज्यांच्या कुटुंबात कुणी माईक समोर भाषणही दिलं नाही अशा कुटुंबातील मिटकरीनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार मनामनात पेरण्याचे कार्य केले.
ऑगस्ट २०१७ मध्ये अकोल्यात मिटकरीनी विशाल बोरे यांच्यासोबत प्रत्येकाला ओजस्वी भाषणकला शिकता यावी या उद्देशाने ‘कॉग्निझंट’ अकॅडमी सुरू केली होती.ज्यामुळे अनेकांनी वक्तृत्व कला आत्मसात करून समाजात प्रेरणादायी विचार मांडण्याचे काम केले.
सर्व अचानक घडत गेले!!
२०१२ ला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील भाषण खूप गाजले व लगेच नाशिक भगूर येथील व्याख्यानाची तारीख मिळाली व प्रवास सुरु झाला देशभरातील व्याख्यांनांचा.
बारामती येथे शारदा व्याख्यानमालेत अजित पवार यांनी मिटकरीचे भाषण ऐकल्यावर वक्तृत्वशैलीचे कौतुक करीत सोबत काम करण्याची संधी दिली.ज्या संधीचे सोने झाले खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून.त्यांनतर लगेच विधानसभेच्या निवडणुका लागल्याने ‘स्टार प्रचारक’ म्हणून मिटकरींनी सर्वाधिक सभा घेतल्या त्याची फलश्रुती म्हणजे राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले.