अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात अवकाळी अस्मानी संकट उभे ठाकल असून आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी पावसासह गारपीटिला सुरुवात झाली आहे.
आज सायंकाळी जिल्हयात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतातील पिकांसह शेतात पडलेल्या मालाला या अवकाळी पावसाचा फटका बसून बळीराजाला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्यांची धावपळ दिसून आली.