बोर्डी-(देवानंद खिरकर ) अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून घेऊन जानार्या आरोपीस अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल चेतन विनोद चेडे याने गावानजिक असलेल्या एका गावातून अल्पवयीन मुलीला 16 जानेवारी 2020 रोजी फूस लावून पळवून नेले होते.
मुलीच्या वडिलांंनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन येथे चेतन विनोद चेडे विरुद्ध कलम 363 भांदवी कलम 3 (2) अ.जा.ज.अ.प.का अन्वये गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्या पासुन चेतन चेडे हा फरार होता.अखेर आज ग्रामीण पोलिस स्टेशन अकोट यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन चेतन चेडे याला ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यात घेतल्या नंतर त्याच्या विरुध्द कलम 366 भांदवि 11,12,पोस्को अन्वये गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.व पुढिल तपास अकोट उपविभागीय अधिकारी सुनिल सोनवणे हे करीत आहेत.