अकोला,दि.९ – कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारच्या कुटुंब व कल्याण मंत्रालयाच्या निर्देशीत मार्गदर्शक तत्वांनुसार अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात आदेशात नमूद केले आहे की, भारत सरकारच्या कुटुंब व कल्याण मंत्रालयाच्या निर्देशीत मार्गदर्शक तत्वांनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रात सतत पाळत ठेवणे, या क्षेत्रातील High Risk Kisk a Low Risk असलेल्या रुग्णांची यादी तयार करुन त्यांचे माऊथ स्वॅब तात्काळ प्रयोगशाळेमध्ये पाठवणे, .Low Risk असलेल्या रुग्णांची यादी तपासणी करिता पाठविणे. बाधीत रुग्ण आढळल्यास त्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे.संबंधीत क्षेत्रामधील नागरीकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.
प्रतिबंधात क्षत्रामध्ये सर्वश्रुत माध्यमांचा वापर करुन नागरीकांना एकत्र न येण्यास तसेच कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ संबंधीत क्षेत्रातील वैद्यकिय पथकासोबत संपर्क साधण्याचे आवाहन करणे. संक्रमणाची साखळी तोडून नवीन क्षेत्रात त्याचा प्रसार रोखणे.वयाच्या ६० वर्षावरील व्यक्ती ( Senior Citizen) यांना जूने आजार जसे. दमा, खोकला. अस्थमा, मधुमेह, निमोनिया, किंवा इतर संसंगजन्य आजार आहेत अशा आजारी व्यक्ती यांची माहिती संकलीत करुन त्यांची आवश्यक ती तपासणी करणे. कोवीड-१९ या आजाराने ग्रस्त नसलेले (NON-COVID) रुग्ण परंतू ज्यांना जूने आजार असल्याचा इतिहास आहे अशा रुग्णांची नियमित तपासणी करणे. सिमांकित केलेल्या बाधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लावण्यात यावी. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये कोणत्याही व्यक्तीस येणे-जाणे, किंवा मुक्त संचार करता येत नाही तसेच दुचाकी वाहन किंवा व्यक्तीच्या हालचालीवर प्रतिबंध राहील अशा उपाययोजना करणे.प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणतीही व्यक्ती विना परवानगी बाहेर पडणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे.
सद्यस्थितीमध्ये मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. त्यामुळे मुस्लीम बांधव रोझे (उपवास) सोडण्याकरिता एकत्र येणार नाही याबाबत तपासणी व जनजागृती करणे नितांत गरजेचे आहे. या क्षेत्रामध्ये औषधीची दुकाने वगळता कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठाने उघडी राहणार नाही याची खबरदारी घेणे. रात्रीच्या वेळेस लोक एकमेकांना भेटणार नाहीत या बाबत आपआपल्या पथकामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये पोलीस विभागाने सर्व नागरीकांना घरीच बसण्याबाबत वाहनामधून सूचित करावे. वारंवार विनंती करण्यात यावी. या संदर्भात पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी आपल्या अधिनस्त यंत्राणना आवश्यक ते निर्देश द्यावे, असे आदेशीत केले आहे.