अकोला,दि.८- कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वच्छता व निर्जंतूकीकरण हे महत्त्वाचे घटक आहेत. आपल्या घरात आणि वैयक्तिक स्वच्छता आपण पाळत असतोच मात्र सार्वजनिक स्वच्छता पाळण्यासाठी नागरिकांनी आपापला परिसर निर्जंतूक करण्याची चळवळ हाती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिनानिमित्त येथील रेडक्रॉस शाखेतर्फे हरे माधव सत्संग या संस्थेस परिसर निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक फवारणी सयंत्राचे वाटप जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते हे सयंत्र हरे माधव सत्संगचे अशोक बुधानी यांचेकडू सुपूर्द करण्यात आले.
या प्रकारचा उपक्रम अन्य संस्थांनीही हाती घ्यावा,असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मानद सचिव प्रभजीतसिंह बछोट यांनी सांगितले की, जिल्ह्यात अशाप्रकारची यंत्रे आणखी उपलब्ध करुन देण्याचा रेड क्रॉसचा प्रयत्न आहे. तसेच फवारणीसाठी लागणारे द्रावणही विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला अशा यंत्राची आवश्यकता भासल्यास त्यांनी प्रकल्प प्रमुख केदार काजळे यांच्याशी ९३७०११४३२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
अधिक वाचा: बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!