अकोला,दि.८- लॉक डाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्यासाठी मागणी केल्यास एस.टी. महामंडळाची बससेवा सशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. २२ जणांसाठी एक बस, एका मार्गावर धावणार आहे. त्यासाठी शासनाने काही अटी शर्ती ठरवून दिल्या असून ज्या नागरिकांना इच्छितस्थळी जायचे असेल त्यांनी संबंधित आगार प्रमुखांशी संपर्क करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग वाढु नये म्हणुन शासनाने दि.२३ मार्च पासुन लॉकडाऊन जारी केला आहे. परिणामी नोकरी/शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत. या नागरीकांना त्यांचे इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरीकांची वाहतुक करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत.
मार्गदर्शक सुचना-
१. बस उपलब्ध करून देताना मागगी केलेल्या गवाचे जाण्या येण्याचे अंतर यास ४४ रुपये प्रती किलोमिटरप्रमाणे गुणून येणारी रक्कम यामध्ये रूपये ५०/-प्रती बस अपघात सहायतानिधी बेरीज करून येणारी रक्कम नगदी स्वरुपात मागणी वेळी जमा करावी लागेल.
२. प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना शासनाने विहित केलेले प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
३. नागरीकांना बसचा प्रवासमार्गाचे सुरुवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानागी देण्यात येईल. मार्गातील मधल्या थांब्यांवर उतरता येणार नाही.
४. बसच्या मागणी करीता बसचा मार्ग वेळ प्रवाशांची संख्या इत्यादीसह बस सोडावयाची आहे त्याठिकाणच्या संबधित आगार व्यवस्थापकांकडे मागणी करावी.
५. बस मध्ये प्रवेश करतांना त्यांचेकडील शासनाने प्रवासास परवानगी दिल्याचे प्रमाणपत्र, नागरिकाचे आधारकार्ड अथवा शासनाने जारी केलेले ओळखपत्र आवश्यक राहिल.
६. बस मध्ये सुरक्षित अंतर ठेवुनच म्हणजेच ‘एका बाकावर एक प्रवासी’ या प्रमाणे एका बसमध्ये २२
प्रवाशांना प्रवास करता येईल. तसेच प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक राहिल.
७. ही बससेवा या लॉकडाऊन कालावधीपुरतीच मर्यादित राहील.
८. बसच्या मागणी करीता संबंधीत तालूका व जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क
साधावा.
असे राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागाच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभाग, अकोला रा. प. विभागीय कार्यालय,मंगरूळपीर रोड, पोस्ट. गांधीनगर, अकोला. फोन क्रमांक ०७२४-२४८९५५१ येथे संपर्क साधावा.