बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील अकोली जहाॅगीर येथील देशी दारूचे दुकान बंद करा अथवा गावाबाहेर करा गावातील सरंपच,ऊपसरपंच,ग्रा.पं.सदस्य पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्षासह संपुर्ण ग्रामस्थाची एक मुखाने अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. करोना विषाणुचा ससंर्ग रोखण्यासाठी संपुर्ण देशात लाॅकडाऊन केल्यामुळे दिड महिन्यापासून बंद असलेली देशी दारूचे दुकान उघडण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
करोना ससंर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना प्रशासन करत असतांना अकोली जहाॅगीर येथील देशी दारूचे दुकानात कुठल्याच नियमाचे पालन होताना दिसत नाही.सोशल डिस्टनिंगचे नियमाचा फज्जा ऊडाला असुन आजु बाजुच्या १० ते १५ गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात येथे दारू खरेदी करीता येत आहेत. तसेच देशी दारूचे दुकान हे गावातील मध्यभागी असुन मंदिर व शाळेच्या काही मिटर अतंरावर व मुख्य चौकात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून नागरीक दारू खरेदी साठी येत असुन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करताना दिसत नाहीत. कोठेही सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याने मोठ्या प्रमाणात गावात वाद विवाद होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे.
सदर देशी दारूचे दुकान गावाबाहेर करण्यासाठी ग्रामपंचायतने २०१९ ला एक ठराव घेवुन गावापासून ५०० मिटर अतंरावर नेण्याची मागणी दारूबंदी विभाग अकोट मुख्य कार्यालय अकोला यांच्याकडे निवेदन देवुन केली होती. एक्साईज विभागाने अद्यापही त्यावर कोणतीच कारवाई केली नाही. सध्या करोना ससंर्ग सुरू असुन गावातील नागरीकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने ग्रामस्थानी वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देऊन सदर देशी दारूचे दुकान बंद अथवा गावाबाहेर करण्याची मागणी सदर निवेदनावर तंटामुक्ती अध्यक्ष गोपाल सिह गयधर पोलीस पाटील नागोराव सोनोने उपसरंपच आशाताई बघेले ग्रामपंचायत सदस्य अमोल बदरके सुनिता वाळके नंदा वाकोडे कविता सोनोने प्रतिभा बगाडे सोनिया भोरखडे अलका ढेमरे देवानंद गोठवाड गजानन खडेराय प्रदिप जायले सुरज किटके अर्जुन गाळखे यांनी केली आहे.
चौकट….
गावातील देशी दारूच्या दुकानामुळे १०ते १५ गावातील नागरीक मोठ्या संख्येने गर्दी करून सर्व नियमाचा फज्जा उडवुन त्यामुळे गावातील नागरिकांनच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच सार्वजनिक ठीकाणी दारू पिऊन वाद विवाद होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करीत असल्याने गावातील देशी दारूचे दुकान बंद अथवा गावाबाहेर करण्यात यावे.
अमोल बदरखे
सदस्य ग्रामपंचायत
अकोली जहाॅगीर.