अकोला,दि.७ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९ अहवाल निगेटीव्ह तर १३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ९५ झाली असून प्रत्यक्षात ७० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ११४० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १०७७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ९८२ अहवाल निगेटीव्ह तर ९५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ६३ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ११४० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९४३, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०७७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८८० तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९८२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९५ आहेत. तर आज अखेर ६३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज प्राप्त झालेल्या ३२ अहवालात १९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता ७० जणांवर उपचार
आता सद्यस्थितीत ९५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील अकरा जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ७० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
आज पॉझिटीव्ह आढळलेले रुग्णांपैकी पाच जण बैदपूरा येथील तर न्यू भीमनगर, भीमनगर, जुने शहर, उगवा-अकोट फैल, माळीपूरा, खंगनपुरा, राधाकिसन प्लॉट व अकोट फैल येथील प्रत्येकी एक असे रहिवासी आहेत.
दरम्यान आजअखेर १०९० प्रवासी आले आहेत. त्यापैकी ५१६ गृहअलगीकरणात व ६७ संस्थागत अलगीकरणात असे ५८३ जण अलगीकरणात आहेत. तर ४०२ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १०४ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.