अकोला :- अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरबूज टरबूज पीकांची लागवड केली. पीक जोमात आले परंतु कोरोनाच्या संकटामुळे चांगला भाव व बाजारपेठ अभावी विक्री होत नसल्यामुळे खरबूज टरबूज खराब होत आहेत. त्यामुके उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कोरोना या आजारामुळे देशात सुरू असणाऱ्या लॉक डाऊन मुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातात आलेल्या खरबूज पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे किरकोळ ग्रामीण खरेदीला ग्राहक नसल्याने कवडीमोल दर देवून विकण्यास हतबल झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करत असतांना खरबूज टरबूज पीकांची लागवड केली.
खरबूज टरबूज पीकही जोमात आले आहे. पंरतु बाजारपेठ उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मोठ्या प्रमानात यावेळेस बऱ्याच एकरामध्ये खरबूजाची लागवड केली. कष्टाने व पाणी असल्याने पीक चांगल्या प्रकारे उत्पादीत झाले आहे. लाँकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेल्या खरबूज पीकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिक वाचा: हिवरखेड मध्ये कालच्या घोर निराशे नंतर आज दारू मिळाल्याने तळीराम खुश