अकोला- दि.७: रमाई, शबरी, पारधी व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची घरे उर्वरित निधी अभावी अर्धवट असून ऐन उन्हाळ्यात हे लाभार्थी कोरोनामुळे हवालदिल असून आर्थिक आणिबाणी व लॉकडाऊनचा फटका बसला आहे. करीता सर्व घरकुल योजनेचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडी कडून प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
रमाई घरकुल, शबरी घरकुल, पारधी घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी महाराष्ट्रभर गरीब व वंचित लाभार्थी यांना घरे मंजूर आहेत. पहिल्या दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी ना निधी दिला आहे. त्यामुळे लाभार्थीनी आपआपल्या झोपड्या तोडून घरे बांधायला घेतली आहेत. ऐन ऊन्हाळ्यात घरावर छत नाही. लॉकडाऊन मुळे रोजगार नाही. तसेच ऊर्वरित निधी मंजूर होत नसल्याने घरकुलांचे कामे रखडली आहेत. योजनेतील अनेक लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासना कडून सुरुवातीला काही रक्कम अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित निधी येणे पूर्णपणे बंद झाल्याने महाराष्ट्रात गोर गरीबांची बांधकाम अर्धवट आहेत.
या योजनेचा दुसरा हप्ता लाभधारकांना न मिळाल्याने ते चिंतेत आहेत.पावसाळा तोंडावर आला आहे. तसेच सध्याचा कडक उन्हाळा आणि कोरोनाचे संकट डोक्यावर असल्याने गरीब कुटुंब उघड्यावर आहेत. याची काळजी घेऊन तातडीने घरकुल लाभार्थी यांना निधी मंजूर करावा. ६७% निधी कपात घरकुल योजनेला लागू करू नये. त्यांना तातडीने संपुर्ण निधी एकरकमी मंजूर करण्यात यावा अशी मागणी पातोडे ह्यांनी केली आहे.
तसे निर्देश संबंधित विभागांना देण्यात येऊन रमाई, शबरी, पारधी व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा निधी त्वरित मंजूर करून पावसाळ्यापुर्वी गोरगरिबांना हक्काची घरे मिळायला हवे असा निर्णय घेतला जावा असे निवेदन वंचित ने ईमेल व्दारे केली आहे.
अधिक वाचा: हिवरखेड मध्ये कालच्या घोर निराशे नंतर आज दारू मिळाल्याने तळीराम खुश