• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल,काय आहेत बदल वाचा सविस्तर बातमी

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in Featured, Corona Featured, कोविड १९, ठळक बातम्या, राज्य, विदर्भ, शिक्षण, शेती
Reading Time: 2 mins read
79 1
0
Jitendra Papalkar
14
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.६ – सम आणि विषम तारखांना आस्थापना सुरु/ बंद ठेवण्याबाबतच्या आदेशात बदल करुन दररोज सकाळी सहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आवश्यक व्यवहारांसाठी अटी शर्तीसह मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

अकोला जिल्ह्यामध्‍ये दि.१७ च्या मध्‍यरात्रीपर्यंत जिवनावश्‍यक व अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सिमाबंदी व संचारबंदी लावण्‍यात आली आहे. जिल्ह्यामध्‍ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तींची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍ती ह्या बहुतांश महानगरपालिका क्षेत्रामधील असून शहराच्‍या सर्व भागामध्‍ये containtment Plan नुसार सर्व क्षेत्र प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
त्यासाठी रविवार दि. ३ मे रोजी जारी केलेले सम विषम दिनांकास प्रतिष्ठाने सुरु व बंद ठेवण्याबाबतचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. सुधारीत आदेशानुसार सकाळी ०६ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत दिनांक ६ ते १७ मे २०२० या संचारबंदीच्‍या कालावधीमध्‍ये आस्थापना व प्रतिष्ठाने सुरु ठेवण्‍याबाबत आदेश दिले आहेत.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

महानगरपालिका क्षेत्रातील / नगर परिषद क्षेत्रातील ज्‍या ठिकाणास प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) म्‍हणून घोषीत केले आहे अशा ठिकाणी खाली दिलेल्‍या मार्गदर्शक सुचना लागू असणार नाहीत.

हॉट स्पॉट व कंटेनमेंट झोन मध्ये पालन करणेसाठी आवश्यक मार्गदर्शक सुचना-
I. हॉटस्‍पॉट म्हणजेच ज्या क्षेत्रामध्ये COVID-19 या साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला आहे असे क्षेत्र किंवा असे क्लस्टर जेथे COVID-19 चा लक्षणीय प्रसार झालेला आहे, असे क्षेत्र, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार ने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यांत आलेले आहे. अशा Containment zone मध्ये प्रवेश करणे व त्याच्या बाहेर येण्यास मनाई करण्यात येत आहे.
II. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय (MoHFW) मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशा हॉटस्पॉट, कंटेनमेंट झोन चे राज्य शासन/जिल्हा प्रशासनाद्वारे सिमांकन करण्यांत आलेले आहे.

III. अशा हॉटस्पॉट/कंटेनमेट झोनमध्ये मार्गदर्शक सुचनांमध्ये परवानगी दिलेल्या बाबींनासुध्दा प्रतिबंधीत करण्यांत येत आहे. कंटेनमेंट झोनच्या परिसरामध्ये स्ट्रिक्ट नियंत्रण ठेवण्यांत यावे, याची खात्री करण्याकरीता अशा परिसरामध्ये आपातकालीन अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय अत्यावश्यक सेवा, कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत सेवा) वगळता इतर कोणतीही व्यक्ती Containment zone चे आंत किंवा बाहेर तपासणी केल्याशिवाय सोडता कामा नये, यासंदर्भात राज्य शासनाने व स्थानिक जिल्हा प्रशासनाने आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय (MoHFW) ने निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधीत यंत्रणांनी करावी.

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये हयाकरीता उपाययोजना विषयी एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सुचना–
१. महानगरपालिका क्षेत्र व नगर परिषद तसेच ग्रामिण क्षेत्रामध्‍ये खालील सेवा प्रतीबंधीत राहतील .
१. सुरक्षेच्‍या उद्देशाशिवाय रेल्‍वे मधून सर्व प्रवासी हालचाल बंद राहील.
२. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्‍वानूसार परवानगी असलेल्‍या व्‍यक्‍ती वगळून इतर व्यक्तिंना आंतर जिल्‍हा व आंतर राज्‍य संचारणास बंदी राहील.
३. सर्व शैक्षणिक प्रशिक्षण, संस्‍था व शिकवणी वर्ग बंद राहतील. तथापी ऑनलाईन/ आंतर शिक्षण यांस मुभा राहील.
४. गृह निर्माण/आरोग्‍य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्‍य सेवा कर्मचारी/ पर्यटकासह अडकलेल्‍या आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरल्‍या गेलेल्‍या व्‍यतिरिक्‍त इतर हॉस्‍पीलिटी सेवा.
५. सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्‍यायाम शाळा व क्रिडा कॉम्‍पेक्‍स , जलतरण तलाव, मनोरंजन पार्क , थिएटर, आणि सभागृह असलेली हॉल व तत्‍सम ठिकाणे.
६. सर्व सामाजिक / राजकीय/खेळ/करमणूक/ शैक्षणिक/सांस्‍कृतीक/धार्मिक कार्ये/ इतर मेळावे.
७. सर्व धार्मिक स्‍थळे /पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्‍यदीवर बंदी राहील.
८. सायकल रिक्‍शा / अॅटो रिक्‍शा
९. टॅक्‍सी ( अॅटोरिक्‍शा आणि सायकल रिक्‍शासह) आणि कॅब अॅग्रीग्रेटरच्‍या सेवा.
१०. जिल्‍हयाअंतर्गत व जिल्‍हयाबाहेरील बसेस बंद राहतील.
११. केशकर्तनालयाची दुकाने, स्‍पॉस आणि सलूनस्( ब्‍युटी पार्लर)
१२. तंबाखु व तंबाखुजन्‍य विक्री करणारी सर्व प्रतिष्‍ठाने / पानटपरी


महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रामध्‍ये तसेच ग्रामिण क्षेत्रामध्‍ये खालील सेवा सुरु राहतील.
१. रुग्‍णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, टेलिमेडीसीन्‍स सुविधा. डिस्‍पेनसरिज केमिस्‍ट औषधी दुकाने ( जनऔषधी केन्‍द्र आणि वैद्यकिय साहीत्‍याचे दुकानासह)
१. सर्व आरोग्‍य सेवा ( Ayush सह) सुरु राहतील.
२. रुग्‍णालये, नर्सिंग होम, क्‍लीनिक, टेलीमेडीसिन सुविधा
३. वैद्यकिय प्रयोगशाळा, आणि संग्रह केन्‍द्रे.
४. औषधी व वैद्यकिय प्रयोगशाळा
५. पशू वैद्यकिय रुग्‍णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथोलॉजी , औषधी विक्री व पुरवठा
६. अधिकृत खाजगी आस्‍थापने जी कोवीड-१९ च्‍या आवश्‍यकतेच्‍या सेवा तरतुदीसाठी किंवा हा आजार रोखण्‍याच्‍या प्रयत्‍नांना समर्थन देतात ज्‍यात होमकेअर, प्रदाते, डायग्‍नोस्टीक रुग्‍णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, सेवादेणारे रुग्‍णालये.
७. औषधे , फार्मास्‍कुटीकल, वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय ऑक्‍सीजन, तसेच त्‍यांचे पॅकेजींग साहीत्‍य, कच्‍चा माल आणि मध्‍यवर्ती घटकांचे युनिट.
८. रुग्‍णवाहीका निर्मीतीसह वैद्यकिय आरोग्‍याच्‍या पायाभुत सुविधांचे बांधकाम.
९. वैद्यकिय आणि पशुवैद्यकिय व्‍यक्‍ती, वैज्ञानिक, परिचारीका, पॅरामेडीकल स्‍टॉफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दाई आणि इतर आरोग्‍य विषयक सेवा. (अॅम्‍ब्‍युलंस सहीत)
१०. शिवभोजन केन्‍द्र ,स्‍वस्‍त धान्‍य दुकान व त्‍याबाबतची वाहतूक .
११. अकोला जिल्‍हयातील तापमान पाहता उष्‍मघाताची शक्‍यता नाकारता येत नसल्‍यामुळे, पंखे, कुलर, वाताणुकूलित यंत्रे ( AC) ऑनलाईन पध्‍दतीने नोंदणी करुन घरपोच वितरण सेवा देता येईल. दुकाने उघडता येणार नाही.

४. कृषि व कृषि संबधित कामे महानगरपालिका / नगर परिषद क्षेत्रामध्‍ये तसेच ग्रामिण क्षेत्रामध्‍ये सुरु राहतील.
a. शेती व फळबागा संबंधातील सर्व कामे पुर्णपणे कार्यरत राहतील.
b. शेतामध्‍ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे करण्‍यास मुभा राहील.
c. कृषी उत्‍पादने खरेदी करणा-या यंत्रणा तसेच शेतमालांची उद्योगाद्वारे , शेतक-याद्वारे शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणा-या यंत्रणांची कामे सुरु राहतील.
d. कृषी उत्‍पादने खरेदी करणा-या यंत्रणा तसेच शेतमालांची उद्योगांद्वारे शेतक-यांद्वारे, शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणा-या यंत्रणांची कामे सुरु राहतील.
e. कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या वतीने चालविण्‍यात येणा-या मंडी किंवा महाराष्‍ट्र शासनाने अधिसूचित केलेल्‍या मंडी सुरु राहतील.
f. शेतीविषयक यंत्राची व त्‍यांचे सुटे भागाची विक्री व दुरुस्‍ती करणारे दुकाने हे त्‍यांचे पुरवठा साखळीसह सुरु राहतील.
g. शेती करीता उपयोगात येणारे भाडेतत्‍वावरील अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स.
h. रासायनिक खते, किटकनाशके व बि बियाणे यांचे उत्‍पादन वितरण व किरकोळ विक्री करणारी कृषी सेवा केन्‍द्र सुरु राहील.
i. शेतमालाची काढणी व पेरणी करणा-या मशीन्‍स जसे कम्‍बांईनड हार्वेस्‍टर आणि इतर कृषि अवजाराची राज्‍याअंतर्गत
j. व आंतर राज्‍य वाहतूक सुरु राहील.

५. मासेमारीच्‍या अनुषंगाने असलेली सर्व व्‍यवसाय महानगरपालिका / नगर परिषद क्षेत्रामध्‍ये तसेच ग्रामिण क्षेत्रामध्‍ये सुरु राहतील.
मासेमारी व अनुषांगीक व्‍यवसायाकरिता वाहतुकीची मुभा राहील.

६. पशूवैद्यकिय विभागाशी संबंधित विषयक खालील प्रमाणे कामे महानगरपालिका / नगर परिषद तसेच ग्रामिण
क्षेत्रामध्‍ये क्षेत्रामध्‍ये सुरु राहतील.
a) दुध संकलन करणे, त्‍याचे वितरण व विक्री. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत.
b) पशुपालन, कुकुटपालन व अनुषंगिक कामे सुरु राहतील.
c) जनावरांच्‍या छावण्‍या व गोशाळा सुरु राहतील.

७. वन संबंधित उपक्रम महानगरपालिका / नगर परिषद तसेच ग्रामिण क्षेत्रामध्‍ये सुरु राहतील.
a) पेसा, नॉन पेसा आणि एफआरए भागातील किरकोळ वनोपज उपक्रम (संग्रहण, प्रक्रिया, वाहतूक व विक्री) जसे की,
तेंडूपत्ता व वन-क्षेत्रातून संकलन केंद्रे स्थापन करणे तसेच गोदामांमध्ये वाहतुकीसह संकलन.
b) जंगलातील आगीपासून बचाव करण्यासाठी जंगलात पडलेल्या इमारती लाकूडांचा संग्रह आणि तात्पुरती / विक्री
आगाराकडे वाहतूक.



८. आर्थीक बाबींशी संबंधीत खालील कामकाज महानगरपालिका / नगर परिषद क्षेत्रामध्‍ये सुरु राहतील
A) बॅंका, ए.टी.एम बॅंकेसाठी आवश्‍यक आय.टी. सेवा, बॅंकींग संवादक/ प्रतिनिधी सेवा इत्‍यादी बॅंकींग सेवा सूरु राहतील.
अ) सर्व बॅंका व एलआयसी नियमित वेळेनूसार सुरु राहतील.
ब) स्‍थानिक प्रशासनाने बॅंकेमध्‍ये सुरुक्षा रक्षक नेमावे तसेच बॅंक कर्मचारी व ग्राहक यांचेकडून सामाजिक अंतर तसेच
कायदा व सुव्‍यवस्‍था राखल्‍या जाईल या बाबत कार्यवाही करावी.

९. सामाजिक क्षेत्र
१. लहान मुले, अपंग, मतिमंद, जेष्‍ठ नागरिक, महिला, विधवा यांचे संबधी चालविण्‍यात येणारी निवारागृहे.
२. लहान मुले, हयांचेसाठी चा‍लविली जाणारी निरिक्षण गृहे, संगोपन केंद्रे व सुरक्षा गृहे.
३. सामाजिक सुरक्षा निवृत्‍ती वेतन वाटप जसे की, वृध्‍दत्‍व, विधवा, स्‍वातंत्र संग्राम सैनिक, भविष्‍य निर्वाह निधी देणा-या संस्‍था
४. अंगणवाडी संबधित कामे जसे की, पोषण आहाराचे घरपोच वाटप. लाभार्थी अंगणवाडी मध्‍ये येणार नाहीत.
५. जिल्हयात कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांवर पोलीस विभागाने जातीने लक्ष ठेवुन कार्यवाही करावी व कौटुंबिक हिंसाचार करणा-या व्यक्तिवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा नियमित अहवाल जिल्हादंडाधिकारी यांना सादर करावा.

व्हिडीओ – अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल, काय आहेत बदल बघा जिल्हाधिकारी यांच्या सूचना

१०. ऑनलाईन शिक्षण प्रोत्‍साहन सुविधा महानगरपालिका / नगर परिषद क्षेत्रामध्‍ये सुरु राहतील.
a) सर्व शैक्षणिक,प्रशिक्षण, शिकवणी संस्‍था बंद राहतील.
b) तथापी, या वरिल संस्‍थानी ऑनलाईन अध्‍यापनाव्‍दारे त्‍यांचे शैक्षणिक सत्र सुरु ठेवता येईल.
c) शिक्षणासाठी शैक्षणिक वाहीन्‍या व दुरदर्शन यांचा वापर करता येईल
d) ऑनलाईन (Online) शैक्षणिक पुस्‍तके/ स्‍टेशनरी ही मागविण्‍याबाबत घरपोच सेवा करता येईल.

११. मनरेगा मधून द्यावयाची कामे.
a) सामाजिक अंतर व तोंडाला मास्‍क लावणे याबाबीची कडक अंमलबजावणी आदेशित करुन मनरेगाची कामे मंजूर
करावी.
b) मनरेगा मधून सिंचन व जलसंधारणाची कामांना प्राधान्‍य देण्‍यात यावे.
c) पाटबंधारे आणि जलसंधारण क्षेत्रातील इतर केंद्र आणि राज्य योजनांनाही मनरेगा कामांशी सांगड घालून
अंमलबजावणी करण्यास मुभा राहील.

१२. सार्वजनिक उपक्रम महानगरपालिका क्षेत्र व नगर परिषद क्षेत्रामध्‍ये पुढीलप्रमाणे कार्यान्वित राहतील.
a) पेट्रोल, डिझेल,एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण , साठवण व विक्री सुरु राहील.
b) राज्‍यामध्‍ये विज निर्मिती, वि‍ज पारेषण व विज वितरण याबाबी सुरु राहतील.
c) पोस्‍ट ऑफीस संबधित सर्व सेवा सुरु राहतील.
d) पाणी, स्‍वच्‍छता, घन कचरा व्‍यवस्‍थापना बाबतची कार्यवाही याबाबतच्‍या सुविधा नगरपरिषद स्‍तरावर सुरु राहतील.
e) दुरसंचार व इंटरनेट या सेवा सुरु राहतील.
) टँकरने पाणीपुरवठा आणि वाहनांच्या चारा पुरवठ्यासह नैसर्गिक आपत्तींशी संबंधित विशेषत: टंचाई / दुष्काळ या सर्व
उपाययोजना.

१३. माल वाहतुकीबाबत सूचना
I. वाहतूक करणारे ट्रक त्‍यासोबत दोन वाहन चालक व एक मदतनीस असावा. मालवाहतूकी साठी जाणारे रिकामे ट्रक किंवा मालवाहतूक करुन परत जाणारे ट्रक यांना सुध्‍दा परवानगी राहील. परंतू चालक यांनी वाहन चालविण्‍याचा परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
II. राज्‍य शासनाने ठरवून दिलेल्‍या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरुस्‍तीची दुकाने सुरु राहतील.
III. सर्व राज्‍य व महामार्गावरील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता ढाबे सुरु राहतील.
१४. खाली नमूद केलेल्‍या जिवनावश्‍यक वस्‍तूचा पुरवठा महानगरपालिका क्षेत्र व नगर परिषद
क्षेत्रामध्‍ये सुरु राहील.
I. जिवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या पुरवठयामधील सर्व सुविधा सुरु राहतील.
II. जिवनावश्‍यक वस्‍तू विकणारे प्रतिष्‍ठान धान्‍य व किराणा,बेकरी, फळे व भाज्‍या, कृषी संबंधित सर्व दुकाने, कृषी सेवा केन्‍द्रे, पेट्रोल पंप, दुधाची दुकाने, अंडे, मास, मच्‍छी, पशुखाद्य व त्यांचा चारा विक्रीची दुकाने सामाजिक अंतराचा नियम पाळण्‍यात यावा.

१५. खाली नमूद केलेल्‍या व्‍यापारी आस्‍थापना सुरु राहतील.
a. प्रिंट व ईलेक्‍ट्रॉ‍निक मिडीया, डिटीएच व केबल वाहीनी सेवा.
b. माहिती व तंत्रज्ञानाच्‍या सेवा ५० टक्‍के कर्मचा-यांसह सुरु राहतील.
c. शासकीय कामाकरीता डाटा आणि कॉल सेंटर त्यांचे कमीत कर्मचा-यांसह सुरु राहतील.
d. ग्रामपंचायत स्‍तरावरील सामान्‍य सेवा केंद्र सुरु राहतील.
e. ई-कॉमर्स कंपन्या.इ-कॉमर्स ऑपरेटरद्वारे वापरलेली वाहने आवश्यक परवानग्या चालविण्यास परवानगी देतील. अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह सर्व वस्तू आणि वस्तूंची ई-कॉमर्स वितरण कुरिअर सेवा.
f. शितगृहे आणि वखार महामंडळाची / शासकीय अन्‍नधान्‍य , सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था प्रणाली अंतर्गतची गोदामे वाहतूक सुरु राहतील.
g. कार्यालय आणि निवासी संकुलांची देखभाल आणि देखभाल करण्यासाठी खाजगी सुरक्षा सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा
h. लॉकडाउनमुळे, वैद्यकीय व आपत्कालीन कर्मचारी व अडकलेल्या पर्यटक आणि व्यक्तींसाठी हॉटेल, लॉज सुरु राहतील
i. महानगर पालिकाक्षेत्र वगळून सेवा देणा-या व्‍यक्‍ती जसे, ईलेक्‍ट्रीशियन, संगणक/ मोबाईल दुरस्‍ती, वाहन दुरस्‍त करणारे केन्‍द्रे , नळ कारागीर, सुतार यांच्‍या सेवा सुरु राहतील.
j. एमएसएमई अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्यतेल इत्यादींच्या उत्पादनात गुंतलेली संस्था सुरु राहील.

१६. उद्योग /औद्योगीक आस्‍थापना ( शासकीय व खाजगी ) यांना खालील कामे करण्‍याची मुभा राहील.
a. महानगरपालिका हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग. अशा प्रकारचे उद्योग सुरु ठेवण्‍यासाठी ( ५० टक्‍के) कामगाराची उपस्थिती ठेवावी . कामगारांची त्‍या ठिकाणी राहण्‍याची व्‍यवस्‍था करावी.
b. महाराष्‍ट्र औद्योगीक विकास क्षेत्रातील सर्व उद्योग सुरु राहतील. उद्योग सुरु ठेवण्‍यासाठी ( ५० टक्‍के) कामगाराची उपस्थिती ठेवावी .
c. औद्योगीक वसाहतीमधील सर्व उद्योगांना जिवनावश्‍यक व इतर पूरक असलेले सर्व प्रतिष्‍ठाने सुरु राहतील.
d. जिवनावश्‍यक वस्‍तूचे उत्‍पादन करणारे युनिटस जसे औषधी उत्‍पादन, वैद्यकिय उपकरणे व त्‍या संबधी लागणारा कच्‍चा माल पुरविणारी प्रतिष्‍ठाने सुरु राहतील.
e. उत्‍पादन करणारे युनिटे ज्‍यांना सतत प्रक्रिया आणि त्‍यांची पुरवठा साखळी आवश्‍यक असते.
f. महानगरपालिका क्षेत्राबाहेरील व ग्रामिण भागातील विटभट्टी.
g. रेल्‍वे मालधक्‍क्‍्यावरील लोडींग / अनलोडींगची कामे २४ तास सुरु राहतील.
h. शासकीय कामाकरिता लागणारा कच्‍चा माल जसे, सिमेंट, लोहा यांचे गोडावून्‍स आवश्‍यकतेप्रमाणे सुरु राहतील.

व्हिडीओ – अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल, काय आहेत बदल बघा जिल्हाधिकारी यांच्या सूचना
१७. बांधकामे खालील प्रकारच्‍या बाधकामास परवानगी देण्‍यात येत आहे.

२. महानगरपालिका क्षेत्राचे हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग.व बांधकाम
३. नविनीकरण ऊर्जा प्रकल्‍पाचे बांधकाम
४. महानगरपालिका हद्दीतील सुरु असलेली शासकीय कामे जेथे मजूर उपलब्‍ध आहे व बाहेरुन मजूर आणण्‍याची गरज पडणार नाही अशी कामे सुरु राहतील. ज्‍या ठिकाणी काम आहे त्‍याच ठिकाणी मजूर राहतील व मजुरांची वाहतुक होणार नाही या अटीवर.
५. मानसूनपूर्व संबंधित सर्व कामे.

१८ पुढील प्रकरणांमध्ये व्यक्तींच्या हालचाली करण्यास परवानगी आहे.
a) आपत्कालीन सेवांसाठी वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय सेवा आणि आवश्यक वस्तू खरेदीसाठी खाजगी वाहने अशा परिस्थितीत चारचाकी वाहनांच्या बाबतीत खाजगी वाहन चालकाव्यतिरिक्त देान प्रवाशाला परवानगी.
b) जिल्‍हा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी जाणारे व कामावरुन येणारे सर्व कर्मचारी. संबंधित कार्यालय प्रमुखाने कर्मचा-यास आदेश व पासेस निर्गमित करण्यात यावे.
c) Containtment Zone प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केलेल्‍या क्षेत्रामधील कोणत्‍याही कामगारास किंवा मजूरास कोणत्‍याही प्रतिष्‍ठानामध्‍ये काम करता येणार नाही. प्रतिष्‍ठानामध्‍ये हया क्षेत्रातील कर्मचारी / कामगार/मजूर आढळल्‍यास सदर प्रतिष्‍ठान तात्‍काळ प्रभावाने सिल करण्‍यात येईल.
d) केन्‍द्रशासनाचे /राज्‍य शासनाचे/ निमशासकीय/ महामंडळ / सार्वजनिक उपक्रम इत्‍यादी कार्यालये सुरु राहतील.

१९. उपरोक्‍त प्रमाणे नमूद केलेली सर्व प्रतिष्‍ठाने ग्रामिण क्षेत्रामध्‍ये (महानगरपालिका क्षेत्र व नगरपरिषद क्षेत्र वगळून ) खालील प्रमाणे नमूद प्रतिष्‍ठाने / व्‍यवसाय वगळून सकाळी ०७ ते सायंकाळी ०४.०० वा. या कालावधीत सुरु राहतील.
१. सायकल रिक्‍शा / अॅटो रिक्‍शा बंद राहतील
२. टॅक्‍सी ( ऑटो रिक्‍शा आणि सायकल रिक्‍शासह) आणि कॅब अॅग्रीग्रेटरच्‍या सेवा. बंद राहतील
३. बसेस सेवा. बंद राहतील
४. केशकर्तनालयाची दुकाने, स्‍पॉ, आणि सलुन, ब्‍युटीपार्लर बंद राहतील
५. पानटपरी,परमिट रुम, रेस्‍टॉरेन्‍ट, हॉटेल इ. बंद राहतील.

सर्व आस्‍थापना / प्रतिष्‍ठाने / उद्योग व इतर व्यावसायीक यांना खालील अटी व शर्ती लागू राहतील.
१. सर्व सावर्जनिक ठिकाणी मास्‍क लावणे अनिवार्य आहे.
२. आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंत्रालय यांनी जारी केलेल्‍या मार्गदर्शक सूचना नुसार सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे.
३. सार्वजनिक संस्‍थांचे, संघटक , व्‍यवस्‍थापक यांनी पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास परवानगी देण्‍यात येवू नये.
४. अंत्‍यविधी प्रसंगी १० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करेल.
५. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल.
६. पान व तंबाखुजन्‍य पदार्थ बंद राहील.
७. कामाचे ठिकाणी व कंपनीच्‍या ठिकाणी त्‍या कामाचे प्रभारी अधिकारी यांनी आरोग्‍य व कूटंब कल्‍याण मंत्रालयाने दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक अंतर राखले जाईल याची खबरदारी घेणे आवश्‍यक राहील. कामाचे ठिकाणी शिफट बदलाचे वेळी व दुपारचेजेवणाचे वेळी सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक आहे.
८. कामाचे ठिकाणी प्रवेश द्वार व बाहेर जाण्‍याचे द्वारावर तसेच सामान्‍य ठिकाणी थर्मल स्‍कॅनिग, हॅन्‍ड वाश व सॅनिटायझर या शक्‍यतोवरचा हात न लावता यंत्र / यंत्रणेचा वापर करावा लागेल. तसेच कामाचे ठिकाणी हॅन्‍ड वाश व सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध ठेवावे लागेल.
९. कामाचा संपूर्ण परिसर वारंवार निर्जतुकिकरण करणे सामान्‍य सूविधा आणि माणवी संपर्कात येणा-या वस्‍तू उदा. डोअर, हॅन्‍डल ई. शिफट बदलतेवेळी खात्री करणे आवश्‍यक राहील.
१०. अत्‍यावश्‍यक गर्दीचे सभेकरिता आणि आरोग्‍य हेतू वगळता ६५ वर्षावरील व्‍यक्‍ती, आजाराने व्‍याधीग्रस्‍त व्‍यक्‍ती, गर्भवती महिला आणि १० वर्षाखालील मुले यांनी घरील थांबावे.
११. खाजगी व सार्वजनिकक्षेत्रातील कर्मचारी / कामगार यांना आरोग्‍य सेतू अॅपचा वापर करणे अनिवार्य आहे. याचा१०० टक्‍के वापर कर्मचारी यांचेकडून होत असल्‍याबाबतची जवाबदारी ही संघटन प्रमुखाची राहील.
१२. Containtment Zone ( प्रतिबंधीत क्षेत्रामधील ) प्रत्‍येक व्‍यक्‍तींने आरोग्‍य सेतू अॅपचा वापर करणे बंध्‍नकारक आहे.
१३. मोठया संखेच्‍या सभा टाळण्‍यात याव्‍या.
१४.कोवीड-१९ रुग्‍णावर उपचार करण्‍यास अधिकृत असलेल्‍या जवळपासच्‍या क्षेत्रातील रुग्‍णालये, क्लिनीक ची माहिती व त्‍याची यादी कामाचे ठिकाण उपलब्‍ध असने आवश्‍यक आहे.
१५. कर्मचारी /कामगारामध्‍ये कोविड-१९ ची कोणतीही लक्षणे आढळून येत असल्‍यास त्‍यास ताबडतोब तपासणीसाठी त्‍वरीत पाठविण्‍यात यावे.
१६. ज्‍या कर्मचारी / कामगारामध्‍ये असे लक्षणे आढळून येत आहेत. अशा कर्मचारी कामगारास वैद्यकिय सुविधा उपलब्‍ध करुन विलगीकरण करण्‍याची कार्यवाही करावी.
१७. प्रतिबंध क्षेत्रातून कोणताही व्‍यक्‍ती बाहेर येणार नाही अथवा बाहेर जाणार नाही.
१८. सर्व बाहेर राज्‍यातून / जिल्‍हयातून आलेले विद्यार्थी / कामगार इतर नागरीक यांना आल्‍यानंतर तालुका समिती यांचेकडे नोंद करुन आरोग्‍याची तपासणी करुन घेतील व आरेाग्‍य सेतू अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच त्‍यांना १४ दिवस होम क्‍वारंटाईन राहणे बंधनकारक राहील.
वरिल आदेशांचे उल्‍लंघन केल्‍यास त्‍यांचेवर परिशिष्‍ट ३ मध्‍ये नमूद केल्‍यानुसार आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम, २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ , फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ , भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ व इतर संबधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्‍यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

Tags: akola coronajitenmdrta papalkarnew rules akola
Previous Post

अकोट शहरामध्ये महसूल विभागाची गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई

Next Post

व्हिडीओ – अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल, काय आहेत बदल बघा जिल्हाधिकारी यांच्या सूचना

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
व्हिडीओ – अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल, काय आहेत बदल बघा जिल्हाधिकारी यांच्या सूचना

व्हिडीओ - अकोला जिल्हयात संचार बंदी आदेशात बदल, काय आहेत बदल बघा जिल्हाधिकारी यांच्या सूचना

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक

बार्शीटाकळी येथे विद्रूपा नदीपात्रात पोहतांना युवक बुडाला,संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने शोधला मृतदेह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.