अकोट( शिवा मगर): अकोट शहर नायब तहसीलदार हरीश बजरंग गुरव यांच्या पथकासोबत आज दिनांक 06/05/2020 रोजी अकोट शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक उपायोजना जनजागृती व सोशल डिस्टन्स चे आवाहन करत सकाळी 08 वाजेपासून गस्त घालत होते त्यावेळी नायब तहसीलदार श्री हरीश गुरव यांना एका निवानी फोनद्वारे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील भागात गुटखा विकत असल्याची ची माहिती मिळाली सदरची विक्री चार चाकी गाडी तुन होत असल्याचे समजले मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9 च्या सुमारास नायब तहसीलदार व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी MH30 AZ 0076 ही मारुती सुझुकी EKO ही चार चाकी उभी असल्याचे दिसले त्या गाडीमध्ये एक इसम आढळून आला त्याला नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रवी तुकारामजी नालट वय 43 वर्ष रा हनुमान नगर हनुमान मंदिरा शेजारी अकोट जि अकोला हे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसून गुटखा पदार्थांची विक्री करताना आढळून आले तसेच नायब तहसीलदार यांनी आकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत सिंग ठाकूर त्यांना घटनेची माहिती दिली असता काही वेळात पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्याठिकाणी दोन मोबाईल किंमत अंदाजे 4000 हजार रुपये गोवा गुटका अंदाजे 17 हजार रुपये व चार चाकी गाडी 180000 हजार रुपये एकूण मुद्देमाल 201000 जप्त करून आरोपी रवी नालट त्यांना ताब्यात घेण्यात आले पुढील कारवाई अकोट शहर पोलीस स्टेशन करीत आहे