• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिसे रोशन खुदा करे! ….तीन वर्षाच्या बालकाची कोरोना विरुद्ध चिवट झुंज

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
three-year-child-corona-fight
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.६ –

फानूस बनके जिसकी
हिफ़ाजत हवा करे,
वो शमा क्या बुझे,
जिसे रोशन खुदा करे!

शायर मचली शहरी यांच्या या ओळी शब्दशः सार्थ ठरविल्या त्या एका तीन वर्षाच्या बालकाने.
तब्बल एक महिने कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने आज विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवित निरोप दिला.
कोरोना म्हणजे काय? हे ही कदाचित त्या बालकाला माहिती नसावे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कातून त्यालाही कोरोनाची लागण झाली. संपर्काच्या चाचण्या प्रशासनाने घेतल्या तेव्हा त्यात हा दि. ७ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झालं. साहजिकच लहान असल्याने त्याची झुंज मोठ्या विषाणूशी होती. आज तब्बल एक महिन्याने त्याला या झुंजीत विजय मिळाला.
या दरम्यान त्याची तब्येत पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह अहवालांच्या दोन टोकांमध्ये हेलकावे खात होती. या दरम्यान या बालकाच्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ चाचण्या झाल्या. त्यातल्या पहिल्या चार तर पॉझिटीव्ह आल्या. पाचवी चाचणी निगेटीव्ह आली. पुन्हा आशा उंचावली. मात्र पाच दिवसांनी घेतलेली सहावी चाचणी पुन्हा पॉझिटीव्ह आली. २४ तासांनंतर सातवी चाचणी पुन्हा निगेटीव्ह आली. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी दि.२ मे रोजी झालेली चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतरही त्याच्या एक्स रे सहित विविध चाचण्या घेऊन चार दिवस त्याला पुन्हा डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले. सर्व तपासण्या आणि चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आल्यानंतरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड उपचार पथकाने आज या बालकाला पूर्ण बरा झाल्यानंतर निरोप दिला. आता हा बालक १४ दिवस घरातच क्वारंटाईन करुन राहिल. त्याने ज्या चिवटपणे कोरोना विरुद्ध झुंज दिली. त्याची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे. डॉक्टरांनीही जिद्दीने उपचारांची शर्थ केली. आणि त्याला कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढलंच. इथच कोरोना हरला!
या लहानग्या रूग्णाला निरोप देण्यासाठी अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,उप अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार बत्रा, डॉ.अपुर्व फावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शामकुमार सिरसाम, डॉ,अपर्णा वाहाने , वैद्यकीय उप अधीक्षक डॉ.दिनेश नैताम व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: 3 years child coronaakola superfast newscity news akolacorona warrior akola
Previous Post

कापूस खरेदी ३१ मे च्या आत पूर्ण करण्याचे नियोजन करा -केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे निर्देश

Next Post

सविस्तर; १०० अहवाल प्राप्तः सात पॉझिटीव्ह, ९३ निगेटीव्ह चौघांचे मृत्यू; एकाचा उपचार घेतांना तर उर्वरित तिघे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona thermal screening

सविस्तर; १०० अहवाल प्राप्तः सात पॉझिटीव्ह, ९३ निगेटीव्ह चौघांचे मृत्यू; एकाचा उपचार घेतांना तर उर्वरित तिघे

akot gutkha mh police

अकोट शहरामध्ये महसूल विभागाची गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.