हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- येथील आरोग्यवर्धिनी मध्ये मध्यप्रदेशात आपल्या गावी परत जाण्याची आस धरीत २९ मजूर कोविड १९ च्या प्राथमिक तपासणीसाठी आरोग्यवर्धीनित दाखल झालेत होते. यात बहुतांश मजूर हे मध्यप्रदेशमधील खकनार या तालुक्यातील डुईफोडया ताजनापूर येथील आहेत. हे जिल्हा बरानपुर मध्यप्रदेशातील नागरिक हिवरखेड येथे शेतीवाडीत वेगवेगळ्या ठिकानी आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरी म्हणून काम करीत होते. पण या कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर लाॅक डाऊन मूळे काम नसल्या मूळे आता त्याना आपल्या गावाकडे परत जाण्याची आस लागली असून घरी म्हातारे लोक व मूलाबाळाची आठवण येते असे त्यांचे कडुन बोलताना समजले शिवाय कुनाकडे थोडीफार शेती आहे तीची मशागत तयारी सुद्दा करायची आहेत यासाठी त्याना घरी जाण्या साठी प्रदेश सिमा ओलांडण्यासाठी लाॅक डाऊन च्या पार्शभूमिवर आरोग्य तपासनी साठी आरोग्य वर्धीनी मधे डाॅक्टर सौ ठाकरे यानी तपासनी करुन कोवीड १९ तपासनी अर्ज घेऊन त्याना फिटनेससर्टफिकेट देतिल पूढिल कार्यवाई ग्रामसेवकाकडून सिमे पर्यतची व्यवस्था करनार असे समजते.