अकोला (प्रतिनिधी)- आत्ताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण दि.२ मे रोजी दाखल झाला होता, काल दि.५ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर रुग्ण खंगनपुरा अकोला येथील रहिवासी होता.कोरोनामुळे मृतकांची संख्या ही सात झाली आहे