अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात कोरोनाने आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात पाय रोवला असून आज बुधवार, ६ मे रोजी यामध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडली. यामध्ये दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण ह्या महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहे, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेड झोनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या थांबता थांबत नसल्याने मंगळवार, ५ मे रोजी कोरोनाचे ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून रुग्णांची एकून संख्या ७५ झाली होती. यामध्ये मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. आज रोजी जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५७, तर एकून रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. जिल्ह्यातील एकून १३ जण कोरोनामुक्त झाले असून, सहा जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला आहे. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. बुधवारी, एकून ३१ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी दोन पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.