नवी दिल्ली : “जेईई’ आणि “नीट’ या स्पर्धा परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा मनुष्यबळ विकास मंत्रालय 5 मे रोजी करणार आहे. “कोविड-19’चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे ताज्या तारखांची घोषणा 5 मे रोजी करतील, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
“जेईई-मेन्स’ ही परीक्षा देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येते, तर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी प्रवेशासाठी “एनईईटी’ (नीट) परीक्षा घेतली जाते. यावर्षी देशभरातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी “नीट’साठी नोंदणी केली आहे, तर जेईई मेन्ससाठी 9 लाखाहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे,