मुंबई: राज्यात लॉकडाऊन कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट), ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली, तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतील.
हेही वाचा : जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये काय सवलत
केंद्र शासनाचा १ मे २०२० रोजीचा आदेश आणि राज्य शासनाने यासंदर्भात वेळोवेळी काढलेल्या आदेशास अनुसरुन पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ४ मे २०२० पासून पुढे २ आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात येत आहे. संबंधित जिल्ह्यातील कोविड १९ विषाणूच्या धोक्याचे स्वरुप (रिस्क प्रोफाईल) लक्षात घेऊन अनुसरुन जिल्ह्यांचे रेड (हॉटस्पॉट), ग्रीन आणि ऑरेंज झोन निश्चित करण्यासंदर्भातील निकष पुढीलप्रमाणे असतील. ज्या जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण नाही किंवा ज्या जिल्ह्यामध्ये मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळला नाही अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात येईल.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुनिश्चित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या लक्षात घेऊन तसेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर आदी निकषानुसार रेड झोन किंवा हॉटस्पॉट जिल्हा निश्चित करण्यात येईल. जो जिल्हा ग्रीन किंवा रेड झोनमध्ये नाही तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असेल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन जिल्ह्यांची यादी आणि संबंधित माहिती राज्यांना वेळोवेळी देतील. जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरील पडताळणीनंतर आणि कोव्हीड १९ च्या प्रसाराचा प्रभाव पाहून रेड आणि ऑरेंज झोन समाविष्ट करु शकतील.
रेड झोनमध्ये समाविष्ट एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील भागात मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नसल्यास तो भाग ऑरेंज झोन समजण्यात येईल. तथापी, या भागात कोरोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील भागात मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नसल्यास तो भाग ग्रीन झोन समजण्यात येईल. तथापी, या भागात कोरोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. महापालिका क्षेत्राबाहेर मागील २१ दिवसात १ किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळले असल्यास हा भाग जिल्ह्यांच्या वर्गवारीनुसार रेड किंवा ऑरेंज झोन समजण्यात येईल.
हेही वाचा : RED ZONE ची नवी यादी; हे जिल्हे आहेत या झोनमध्ये वाचा सविस्तर बातमी
झोनचे वर्गीकरण करताना, रुग्णांची नोंद ही त्यांच्यावर जिथे उपचार सुरु आहेत. त्या ठिकाणापेक्षा ते जिथे आढळले तिथे करण्यात येईल.
हे बंद राहील आणि याला परवानगी
मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहील.
वैयक्तीकरित्या कोणालाही आंतरराज्यीय प्रवास करण्यास बंदी. वैद्यकीय कारणास्तव तसेच अत्यावश्यक लोकांना परवानगी.
शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध क्लासेस यांना बंदी. ऑनलाईन/ इ-लर्निग शिक्षणाला परवानगी.
आरोग्य कर्मचारी, पोलिस, शासकीय अधिकारी, वैद्यकीय सेवा पुरविणारे कर्मचारी याना परवानगी.
सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्पपणे बंदी.
सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.
सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.
प्रतिबंधित क्षेत्रासाठी
या क्षेत्रात कडक तपासणी करण्यात येईल.
आत आणि बाहेर जाण्याचे मार्ग निश्चित केलेले असावे.
माल वाहतूक आणि विविध सेवा पुरविणाऱ्याना तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ये-जा करण्याची परवानगी.
व्यक्ती आणि वाहने यांची तपासणी.
संबंधित क्षेत्रात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवणे.
ऑरेंज झोनमधील व्यवहार : (कंटेनमेंट झोन बाहेर)
जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही बस सेवा सुरू ठेवता येणार नाही.
केश कर्तनालय, स्पा आणि सलून बंद राहतील.
काही अटींच्या अधीन राहून खालील बाबींना परवानगी देण्यात येईल.
एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल.आवश्यक ती परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींकडून पासेस घेणे आवश्यक राहील.
चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
ग्रीन झोन मधील व्यवहार
ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील. मात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे सिनेमागृह,शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा, सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत.
अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल.
प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादीत इतकीच असावी.
बस सेवेला फक्त ग्रीनझोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल.
राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून ज्या गोष्टींना परवानगी दिली आहे. त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून सुरू ठेवता येतील.
रेड झोन (हॉटस्पॉट्स) मधील उपक्रम (कंटेन्मेंट झोन बाहेरील)
पुढील उपक्रमांना/कृतींना परवानगी दिली जाणार नाही :
सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा.
टॅक्सी आणि कॅबजिल्ह्यार्तंगत व आंतरजिल्हा बस चालविणे केशकर्तनालय, स्पा आणि सलून.