अकोला : अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज शनिवार दि.२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- ४७
पॉझिटीव्ह- सहा
निगेटीव्ह- ४१
अतिरिक्त माहिती
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मोह.अली रोडवरील रहिवासी आहे, तर उर्वरित पाच हे एका मयत पॉझिटिव्ह महिला रुग्णाच्या संपर्कातील आहेत. ते सर्व जण एका खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. मयत महिला शासकीय रुग्णालयात येण्याआधी या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती.
दरम्यान, काल(दि.१)रोजी दाखल ७९वर्षीय रुग्णाचा उपचार घेताना काल रात्री मृत्यू झाला आहे.
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)