अकोला(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळविले असल़्याचे दिसून येत आहे. काळ्या बाजारातून एवढ्या महागड्या वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंत केले आहे.
मागील काही महिनाभरापासून जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. सुरूवातीचे काही दिवस बरे वाटत असले तरी आता, मात्र त्याची तिव्रता जाणवू लागली आहे. बाजारात अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, या वस्तुंचा काळाबाजार सुरू आहे. छापील किमतीपेक्षा चौपट दराने या वस्तुंची विक्री केली जात आहे. या वस्तू जीवनावश्यक नसल्याने कुणी त्याची तक्रार करत नाही.२०रूपयांना मिळणारी गुटखाचीr पूडी ४० ते १०० रूपयांपर्यंत विकली जात आहे. अधिकृत मद्य विक्रीचा दुकाने सध्या बंद आहेत. यामुं़ळे, अनाधिकृत मद्यविक्रीला ऊत आला आहे.
१३० ते १६० रूपयांना मिळणारी विदेशी दारूची बाटली आता चक्क ५०० ते ५५० रूपयांना तर २ हजार रूपयांची बॉटल ४ हजार पाचशे तर ५ हजार रूपयाला विकली जात असल्याची चर्चा आहे. तर, ८० ते १०० रूपयांना मिळणारी देशी मद्याची बाटली १५० ते २०० रूपयांंपर्यंत विकली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हाताला काम नाही, पुढे काम मिळेल की नाही, याची शास्वती नाही. थकलेला पगार मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे, हाती असलेला पैसा व्यसनावर खर्च करण्यापेक्षा ते पूरवून वापरण्यातच अनेकांनी धन्यता मानली आहे. अनेकजण गेल्या काही दिवसांपासून अशा वस्तुंची खरेदी टाळत आहेत. परिणामी, अनेकजण व्यसनांपासून दूर जावू लागले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे घरातील कत्र्यापुरूषांचे व्यसन सुटत असल्याने घरातील गृहिणींच्या चेहN्यावर वेगळेच समाधान दिसत आहे. काही गृहिणींनी तर चक्क देशाला लॉकडाऊन केल्यामुळे आमच्या पतीचे व्यसन सुटले असल्याचे बोलून दाखविले आहे
आता दारूचे कारखानेही कायमचे बंद व्हावेत. दारू गाळणा-यांवर ३०२ लावावे.