अकोट(शिवा मगर): आज दुपारी अकोट शहरातील लोहारी रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर कॉलनीत एका घरी किरकोळ नळ दुरुस्तीचे काम करत असताना नळ कारागीर पंकज वानखडे नामक व्यक्तीचा विजेचा शॉक लागून अकस्मात मृत्यू झाला. काम करत असताना घराच्या बाहेरील बीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेला स्पर्श झाला तो व्यक्ती वरच्या माळ्यावरून खाली पडला आणि बेशुद्ध झाला असता आजू बाजूच्या घराजवळील लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले तो जिथे मरण पावला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.सदरहु मययत व्यक्ती पंकज वानखडे वय 25 वर्षे मोहाळा येथील रहिवाशी असल्याचे समजते.पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत.