अकोला(प्रतिनिधी)- दिनांक २२ एप्रिल भाग्यश्वरी हिचा ७ वा वाढदिवस होता परंतु तिने आपल्या वाढदिवशी जो खर्च होतो तो यावर्षी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तिने पी एम केअर फंडला दिला.
माझा देश हीच माझी ओळख आहे व आज माझ्या देशाला माझी गरज आहे.देशाच्या कोरोनाविरूध्द लढतीत,मी भाग्यश्वरी किशोर गायकवाड माझा खारीचा वाटा म्हणुन 2100 रुपयांचा धनादेश देत आहे असे सांगितले. यावेळी भाग्यश्वरी ने अकोला जिल्हा महानगर अध्यक्ष माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या मार्फत पी एम केअर फंड ला सुपूर्द केला यावेळी संजय जिरापुरे राम खरात शाम खरात मुलीचे वडील श्री किशोर अशोकराव गायकवाड व मुलीची मोठी बहिण कु राजेश्वरी गायकवाड व भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माहेश्वरी भवन येथे सुपूर्द केला आहे.