अकोट (शिवा मगर): लोकडाऊन चा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यानी अकोट शहरातील बियर बार फोडला. यावेळी महागळ्या दारू सह इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 1 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. अकोट हिवरखेड मार्गावरील ड्रीमलँड वाईन बार अँड रेस्टॉरंट नावाने बार आहे, लॉक डाऊन असतांना अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून बार मधील विविध कंपनीची 79 हजाराची दारू लंपास केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, LED TV, LCD, संगणक संच, CCTV RECORDR, असा एकूण 1 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बार मालक नंदकिशोर जांभूळकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरुध्द भांदवी 461 380 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.