• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोना सद्यस्थितीबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Team by Team
May 1, 2020
in अकोला, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
meeting
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोरोना विषाणू पार्श्वभुमिवर व त्या अनुषंगाने अंमलात असलेल्या लॉक डाऊन कालावधीत प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

येथील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची रुग्ण संख्या, त्यांच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या चाचण्या, त्यांच्यासाठी राबवावयाची उपचार पद्धती याबाबत डॉ. घोरपडे यांनी माहिती दिली. जिल्ह्यात सध्या बाहेरुन आलेल्या प्रवाशांची संख्या २७ हजार ४९६ असून त्यापैकी प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात २६ हजार ७९२ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ७०४ जण अजूनही गृह अलगीकरणात आहेत.

त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोरोना अनुषंगाने लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोरोना संसर्गितांच्या राहण्याच्या ठिकाणानुसार प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून त्यात अकोला शहरात बैदपूरा व अकोट फैल. पातूर व बाळापूर असे चार प्रतिबंधित क्षेत्र असून या प्रतिबंधित क्षेत्रात १५० पथकांची नियुक्ती करुन १४६०० घरांमधील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अंती संदिग्ध लक्षणे आढळलेल्या २६६ जणांना अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात उपचार सुविधेचीही पूर्व तयारी करण्यात आली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ऐनवेळीची आवश्यकता भासल्यास आयकॉन हॉस्पिटल १५० खाटा व ओझोन हॉस्पिटल १०० खाटा अशी एकूण ३८२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सौम्य लक्षणे आढळणाऱ्या संदिग्ध रुग्णांसाठी कोविड हेल्थ सेंटर जिल्ह्यात सहा ठिकाणी तयार करण्यात आले असून त्यात ३७० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ज्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवायचे आहे अशांसाठी जिल्ह्यात १४ कोवीड केअर सेंटर्स तयार करण्यात आले असून त्यात ११५० जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आवश्यक सामुग्री पी पी ई किट्स, एन ९५ मास्क, ट्रिपल लेयर मास्क व तत्सम साहित्य हे पुरेशा प्रमाणात आहे. तसेच औषधीचा पुरेसा साठा आहे.

जिल्ह्यात २५ ठिकाणी स्थलांतरीत परप्रांतिय मजूरांचे आश्रयस्थाने तयार करण्यात आले असून २०४८ जणांनी त्यात आश्रय घेतला आहे. त्यांचे निवास, भोजन, वैद्यकीय तपासणी आदी प्रकारची व्यवस्था त्यात करण्यात आली आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्थांकडून जिल्ह्यात २५ सामुहिक स्वयंपाक गृहे तयार करण्यात आली असून २०३९ लोकांना जेवण पुरविण्यात येत आहे. तसेच दहा शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाले असून त्यामार्फत १६०० हून अधिक थाळ्यांचे जेवण गरजूंना दिले जात आहे. जिल्ह्यात पुरेसा भाजीपाला, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. काळाबाजार, साठेबाजी होऊ नये म्हणून प्रत्येक तालुकास्तरावर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय गॅस वितरण, घरपोच किराणा आदी उपाययोजना राबवून लोकांना वस्तू पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात लॉक डाऊन काळात विविध विभागांमार्फत विविध कामांसाठी एकूण २९७७ परवानग्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वस्त धान्य दुकानांद्वारे विविध योजनांमधून होत असलेल्या धान्य वितरणाची माहिती देण्यात आली. तसेच महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना कामांबाबतही माहिती देण्यात आली. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व पिक कर्ज योजना याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले की, कोवीड बाबत उपाय योजना सुरु असतांना कोवीड व्यतिरित अन्य वैद्यकीय उपचार सुविधा सुरु असल्या पाहिजेत. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रमही सुरु असला पाहिजे. जिल्ह्यात सुरु झालेल्या उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठीचे नियोजन करुन ऐनवेळी कोठेही पाणी टंचाई भासू नये यासाठी नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी कोवीड चाचणी प्रयोगशाळा येथेही भेट देऊन माहिती जाणून घेतली.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरमनपा आयुक्त संजय कापडणीस
Previous Post

आजच्या आठही अहवालांसह एकुण ४३५ अहवाल निगेटीव्ह

Next Post

‘कोरोनाविरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा गाण्यातून प्रबोधनाचा उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Sanjay khadse

‘कोरोनाविरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा गाण्यातून प्रबोधनाचा उपक्रम

Ujjwala Yojana

उज्‍वला योजनेतील लाभार्थ्‍यांना एप्रिल ते जुन मोफत सिलेंडर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.