अकोला:- बोरगाव मंजू पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात गत काही दिवसांपूर्वी तोतया पोलीस म्हणून सतत ४ दिवस ४ साथीदारांसह धूमाकूळ घालणारा अज्जू ठाकूर नामक कुख्यात आरोपींसह किरण पांडे , दिपक अघर्ते, कुणाल ठाकूर या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेवर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे अप.१३१ /२०२० नुसार ४१९, ३२४, १७०, १७१, ४५४, ५०६ व ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात येवून या आरोपींकडून २ मोटर सायकल, व काठी जप्त करण्यात आली आहे.
१९ एप्रिल ला विद्यमान न्यायालय अकोला यांचे समोर उपस्थित करण्यात आल्या नंतर न्यायालयाने या चारही आरोपींना २१ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गत काही दिवसां पूर्वी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील धोतर्डी, सांगळुद, चाचोंडी, दहिगाव गावंडे, वाकी या ग्रामीण भागातील परिसरामध्ये लॉकडाऊनचा गैरफायदा घेत ग्रामीण भागातील निरपराध नागरिकांना विनाकारण मारहाण करीत पोलीस असल्याची या आरोपींनी बतावणी केली होती. त्यास धोतर्डी येथील नागरिकांनी मारहाण करीत पकडून ठेवले होते.
परंतु त्यांने बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तेथून साथीदारांसह फरार झाला होता. त्याच्या तपासाची जबाबदारी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार हरीष गवळी यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव यांच्याकडे सोपविली होती. पोलिसांना बदनाम करणाऱ्या या तोतया पोलीस म्हणून वावरणाऱ्या आरोपींना अटक करणे अत्यंत आवश्यक होते. या आरोपींनी कधी सिव्हील लाईन तर कधी एलसीबी चे पोलीस असल्याचे नागरिकांना सांगितले होते. परंतु नागरिकांनी त्याच्या हावभाव व गैरवर्तनावरुन शंका आल्याने चोप देत बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला तक्रार सुध्दा दाखल केली होती.
अकोला जिल्हा कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शैलेष सपकाळ यांचे मार्गदर्शना खालील पथकाने कुख्यात आरोपी असलेला अज्जु ठाकुर यास जठार पेठ चौक अकोला येथील व्यावसायिक ठिकाणांवरील रस्त्यांवरून नागरिकांची व व्यावसायिकांवर त्याची असलेली भिती व दहशत घालविण्याकरिता धिंड काढीत त्यास हात वर करुण माफी मागण्यास भाग पाडले होते. या आरोपींचा एलसीबी व बोरगाव मंजू पोलीसांनी तात्काळ शोध व तपास करीत अटक केल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा: लॉकडाऊन २.० मधून कुठल्या क्षेत्रांना मर्यादित कालावधीसाठी मुभा; तर कुठल्या क्षेत्रात मुभा नाही