अकोला,दि.१७ – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉक डाऊन त्यानंतर लॉकडाऊनचा वाढवण्यात आलेला कालावधी, यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना व समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यांच्या ह्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २४ समित्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. यासंदर्भातील आदेशही आजच त्यांनी निर्गमित केले.
या चोवीस समित्यावर त्यांचे विषय याप्रमाणे-
वैद्यकीय सेवा समिती- आरोग्य सेवेबाबत सर्व बाबींवर उपाययोजना आखणे. या समितीत अपर जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आयएमएचे अध्यक्ष, अन्य वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी हे सदस्य असून जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य सचिव आहेत.
औषध द्रव्ये पुरवठा समिती- आरोग्य सेवेअंतर्गत येणाऱ्या औषध पुरवठ्याबाबत उपाययोजना करणे या समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव हे सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन हे आहेत.
अन्न धान्य वितरण समिती- लॉक डाऊन मध्ये वाढ झाल्याने शासनाने घोषित केलेल्या अन्न धान्य वितरणाचे नियोजन करुन शिधापत्रिकाधारकांना, शिधापत्रिका नसणाऱ्यांना तसेच बेघर निराधार व्यक्तींना व कुटूंबांना धान्य वितरणाची व्यवस्था करणे, गॅस, पेट्रोल, डिजेल यांच्या पुरेशा पुरवठ्याचे नियोजन करणे. या समितीचे अध्यक्ष उप जिल्हानिवडणूक अधिकारी हे असून तहसिलदार यांचे प्रतिनिधी, स्वस्तधान्य दुकानदार संघटना प्रतिनिधी, गॅस वितरण संघटना प्रतिनिधी, पेट्रोल डिजेल वितरण संघटना प्रतिनिधी हे सदस्य असून जिल्हा पुरवठा अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
भाजीपाला व बाजार नियमन समिती- भाजीपाला, फळे दूध व नाशवंत वस्तूंची कमतरता भासणार नाही यासाठी उपाययोजना करणे, किराणा मार्केट, भाजीबाजारात गर्दी होणार नाही, लोक खरेदीसाठी घराबाहेर पडणार नाहीत याचे नियोजन करणे. या समितीचे अध्यक्ष हे उपजिल्हा निवडणूक अधिकारी असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प, उपायुक्त मनपा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, प्रकल्प संचालक नगरपालिका प्रशासन, कृषि अधिकारी जि.प., भाजी बाजार विक्रेता प्रतिनिधी, किराणा किरकोळ बाजार प्रतिनिधी, होलसेल किराणा बाजार प्रतिनिधी हे सदस्य असतील तर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
शेतीविषयक अडचणी निवार समिती- शेतमाल कापणी, शेतमाल विक्री, कृषि अवजारे, कृषि बाजारपेठ इ. बाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत उपाययोजना करणे. या समितीचे अध्यक्ष हे उपजिल्हाधिकारी महसूल हे असून कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव, जि. प. कृषि अधिकारी, जिल्हा दुय्यम निबंधक सहकारी संस्था, कृषि सेवा केंद्रांचे प्रतिनिधी, जि.म. बॅंक प्रतिनिधी, अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक हे सदस्य असून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
उद्योग विषयक समिती- एमआयडीसी येथे जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे कारखाने सुरू ठेवणे, लॉक डाऊन कालावधीत कामगारांची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन करणे. या समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी रोहयो हे असून उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा प्रदुषण निर्मुलन अधिकारी हे सदस्य असून कार्यकारी अभियंता म. औ. विकास महामंडळ, अकोला हे सदस्य सचिव आहेत.
पाणीपुरवठा नियोजन समिती- शहरी व ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची दक्षता घेणे. यासमितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी महसूल हे असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प, कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा , उपायुक्त मनपा, प्रकल्प अधिकारी नपा प्र हे सदस्य असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
विद्युत पुरवठा नियोजन समिती- शहरी व ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घेणे. शेतकऱ्यांना तसेच पाणी पुरवठा योजनांना विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे. या समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी महसूल हे असून कार्यकारी अभियंता विज वितरण कंपनी, उपमुख्य कार्यकारी जि.प., उपायुक्त मनपा, मुख्याधिकारी न.पा हे सदस्य असून कार्यकारी अभियंता विज वितरण कंपनी शहर हे सदस्य सचिव आहेत.
कामगार कल्याण समिती- कामगारांच्या प्रश्नांबाबत उपायोजना करणे व त्याबाबत दक्षता घेणे. या समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी रोहयो हे असून कार्यकारी अभियंता एमआयडीसी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी हे सदस्य असून सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त हे सदस्य सचिव आहेत.
वाहतुक व्यवस्थापन समिती- जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक नियंत्रण, अत्यावश्यक वाहनांचे नियंत्रण व वाहतूक व्यवस्था करणे. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन हे या समितीचे अध्यक्ष असून वाहतुकदार संघटनांचे प्रतिनिधी, पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा हे सदस्य असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
कायदा व सुव्यवस्था समिती- कलम १४४ अंतर्गत करावयाची कारवाई, लॉक डाऊन काळात नागरिक घराबाहेर पडणार नाहीत याचे व्यवस्थापन करणे, पोलीस विभागाशी समन्वय साधणे. अपर जिल्हादंडाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून उपविभागीय दंडाधिकारी अकोला हे सदस्य तर पोलीस उपअधिक्षक गृह हे सदस्य सचिव आहेत.
सेवाभावी संस्था नियोजन समिती- लॉक डाऊन कालावधी वाढल्याने सेवाभावी संस्थाकडून होणाऱ्या मदतीबाबत साधनांचे नियमन करणे, अधिकाधिक गरजू लोकांना मदत पोहोचविण्याबाबत नियोजन करणे, उपजिल्हाधिकारी रोहयो हे या समितीचे अध्यक्ष असून समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प हे सदस्य असून धर्मदाय आयुक्त यांचे प्रतिनिधी हे सदस्य सचिव आहेत.
सहकारी संस्था व कृऊबा नियंत्रण समिती- शेतकरी, शेतमजूर यांना लॉक डाऊन परिस्थिती पाहून कर्ज उपलब्धतेबाबत नियोजन करणे, बाजार समित्यांमार्फत शेतमाल विक्रीबाबत व्यवस्था करणे. या समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी हे असून बाजार समितीचे सचिव, सहकारी बॅंकेचे प्रतिनिधी हे सदस्य असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे सदस्य सचिव आहेत.
बॅंक व्यवस्थापन समिती- शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना कर्जवसूलीबाबत दबाव व तगादा न लावण्याबाबत उपाययोजना करणे, जनधन योजनेतील रकमेचे संबंधितांना वितरण करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करणे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे अध्यक्ष असून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रतिनिधी हे सदस्य तर जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक हे सदस्य सचिव आहेत.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या निवारण समिती- दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व अनाथ यांच्या समस्या निवारणाबाबत उपाययोजना करणे. निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, महिला व बालकल्याण अधिकारी हे सदस्य असून जि.प. समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
नागरी भागातील लोकांच्या अडचणी निवारण समिती( मनपाक्षेत्र वगळून)- लॉक डाऊन कालावधी वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक करणे, नागरिक घराबाहेर पडणार नाहीत यासाठी दक्षता घेणे. निवासी उपजिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून उपायुक्त मनपा, मुख्याधिकारी हे सदस्य तर नपा प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या अडचणी निवारण समिती- लॉक डाऊन कालावधी वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक करणे, नागरिक घराबाहेर पडणार नाहीत यासाठी दक्षता घेणे. मनपा आयुक्त हे अध्यक्ष असून उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी हे सदस्य तर उपायुक्त मनपा हे सदस्य सचिव आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्य व इतर अडचणी निवारण समिती- लॉक डाऊन कालावधी वाढल्यामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक करणे, नागरिक घराबाहेर पडणार नाहीत यासाठी दक्षता घेणे. या समितीचे अध्यक्ष जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे असून समाज कल्याण अधिकारी जि.प., कार्यकारी अभियंता जि.प., कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा, जिल्हा कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी हे सदस्य असून जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
तालुकास्तरीय अडचणी निवारण समिती- लॉक डाऊन कालावधी वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक करणे, नागरिक घराबाहेर पडणार नाहीत यासाठी दक्षता घेणे. अध्यक्ष उपविभागीय अधिकारी हे असून गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी हे सदस्य असून तहसिलदार हे सदस्य सचिव असतील.
निधी व्यवस्थापन समिती- शासनाकडून प्राप्त निधीचे नियोजन करणे, जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीचे नियोजन. अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी असून जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लेखाधिकारी मनपा, पोलीस अधिक्षक गृह, समादेशक होमगार्ड, प्रकल्प अधिकारी नपाप्र हे सदस्य असून जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव आहेत.
कोवीड केअर व्यवस्थापन- जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटर मधील रुग्णांबाबत आवश्यक माहिती घेणे, केंद्रासाठी आवश्यक उपाययोजना करणे. या समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी पुनर्वसन हे आहेत. तर उपविभागीय अधिकारी अकोला, तहसिलदार, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांचा प्रतिनिधी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी, पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, उपायुक्त मनपा, प्रकल्प अधिकारी नपाप्र, हे सदस्य असून जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे व्यवस्थापन- पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे हाय रिस्क म्हणून यादी तयार करुन त्यांना उपचारासाठी दाखल करणे इ. विशेष भूसंपादन अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून उपविभागीय अधिकारी अकोला, तहसिलदार अकोला, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रतिनिधी, पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी, प्रकल्प अधिकारी न. पा. प्रशासन हे सद्स्य असून उपायुक्त मनपा विकास हे सदस्य सचिव आहेत.
कामे सुरु करणे बाबत समिती- केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार पावसाळ्यापूर्वी करावयाचे रस्ते, जलसंधारण, मग्रारोहयो कामे सुरु करणे बाबत निर्णय घेणे. अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सांबावि, कार्यकारी अभियंता जलसंधारण, कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा जि.प. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग हे सदस्य तर उपजिल्हाधिकारी रोहयो हे सदस्य सचिव आहेत.
प्रसिद्धी समिती- प्रशासनस्तरावरुन होणाऱ्या कामांना प्रसिद्धी देणे, लॉक डाऊन कालावधीत लोकांचे प्रबोधन करणेबाबत उपाययोजना करणे. निवासी उपजिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रतिनिधी, पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी हे सद्स्य असून जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
या प्रमाणे समित्यांची रचना करण्यात आली आहे.