तेल्हारा- कोरोणा विशाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून जो लाँकडाऊन लावण्यात आला आहे, त्यादरम्यान मोलमजुरी करूण जिवण जगणाऱ्यांची परीस्थिती आता हलाखीची झाली. असुन त्यांच्या कडे पुरेसा अन्न पुरवढा ऊपलब्ध नसुन या संचारबंदी दरम्यान त्यांच्यावर ऊपासमारीची पाळी आलेली आहे. अशा सर्व गरजु लोकांना जसे की,
१) ज्यांच्या कडे राशन कार्ड असुन RC नंबर असुन सुध्दा त्यांना राशन मिळत नाही
२) ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे परंतु राशन मिळत नाही
३) आणी ज्यांच्या कडे राशन कार्डच नाही
अशा लोकांना आपण शासनाकडून लवकरात लवकर जिवनावश्यक अन्न धाण्याचा पुरवठा करुण या लोकांची ऊपासमार थांबवुन त्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी नगरसेविका आरती गायकवाड यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अधिक वाचा: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3000 च्या पार, आज 165 नव्या रुग्णांची नोंद