पातूर: पातूर येथील नगर परिषदेच्या सामाजिक सभागृहात प्रशासनाच्या देखरेखखाली क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलेल्या काही मजूर आणि विद्याथ्र्यापैकी ३0 जणांनी पलायन केल्याची घटना बुधवार ला सकाळी निदर्शनास आली.
लॉकडाउनमुळे राजस्थान, तेलंगणा, मुंबई या विभागातील असलेले विद्यार्थी आणि मजूर हैद्राबादकडे जात असताना जिल्हा बंदी दरम्यान पातूर पोलीस आणि प्रशासन यांनी ताब्यात घेउन न.प.च्या मौलाना आझाद सांस्कृतिक सभागृहात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. परंतु १४ एप्रिलाच्या रात्री यातील ३0 जणांनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दीपक बाजड, पो.नि. गजानन गुल्हाने, नायब तहसिलदार सैय्यद अहसानोद्दीन, मुख्याधिकारी सोनाली यादव, न.प.अधीक्षक मोहोम्मद अफसर, उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन आढावा घेतला आहे. याप्रकरणी पातूर पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.
अधिक वाचा: केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य १ मे पासूनच- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती