पातूर (सुनिल गाडगे): लॉक डाउन असल्याने मुळ गावी जाण्यासाठी अडकून पडलेल्या मजुर यांची उपासमार होउ नये म्हणून पातूर येथील प्रशांत म्हैसने यांनी मदतीचा हात दिला.
चेलका येथे गव्हाचा हंगाम करण्यासाठी लहान लहान मुलाबरोबर 27आदिवासी कुटुंब हिवरा(नाईक)ता.चिखली जि.बुलढाणा येथुन एक महिन्या अगोदर आलेले आहेत.त्यांचा गव्हाचा हंगाम संपला आता त्यांना काही काम नाही. ते सर्व कुटुंब १५ तारखेनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर गावाला जाण्याच्या तयारीत होते.
परंतु लॉकडाऊन ची तारीख वाढल्यामुळे त्यांच्या समोर संकट ऊभे आहे. याकाळात त्यांना उपासमार होवू नये म्हणून माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पातूर येथील प्रशांत म्हैसने हे दान दाते समोर आले आणि त्यांनी दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या सर्वच पदार्थ म्हणजे आटा, तूरडाळ ,तेल,साबण,मीठ, मिरची, मसाला, तांदूळ,हळद यासह ईतर साहित्याचे वाटप स्वतः चेलका या गावी जाऊन केले. यावेळी 27 कुटुंबांना हा वाटप प्रशांत म्हैसने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार देवानंद गहिले, चेलका येथील रामेश्वर उंडाळ उपस्थित होते