अकोला- कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉक डाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांचा व सेवाभावी संस्थांचा मदतनिधी देण्याचा ओघ सुरुच आहे. आजपर्यंत जिल्ह्यात २४ लक्ष तीन हजार ९०१ रुपये इतका निधी जमा झाला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी नऊ धनादेश प्रासप्त झाले असून ते पाच लक्ष ५० हजार ४०० रुपये इतक्या निधीचे आहेत. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १४ धनादेश प्राप्त झाले असून त्याद्वारे १८ लक्ष ५३ हजार ५०१ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असा एकून २४ लक्ष तीन हजार ९०१ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
श्री गुरुसिंह सभेचे एक लाख रुपये
आज सकाळी येथील श्रीगुरुसिंह सभेच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी श्रीगुरुसिंह सभेने आव्श्यकता भासल्यास भोजन व्यवस्थाही सुरु करण्याची तयारी दर्शविली. यावेळी अध्यक्ष रामेंदरसिंह छतवाल, महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सिलचे अध्यक्ष ॲड बी. के. गांधी, संतसिंह ओबेराय, जसमतसिंह ओबेराय, तरणजितसिंह ओबेराय, भुइंदरसिंह छतवाल, रिची कोहली, रेड क्रॉसचे सचिव प्रभजीतसिंह बछेर, मोहन काजळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.