अकोला,दि.१२– जिल्ह्यात बाहेरील राज्यातून वा जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार ६६४ जणांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यातील २२ हजार १४५ जणांचा गृह अलगीकरणाचे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
या सर्व जणांची तपासणी ही महानगरपालिका स्तरावर ५२५९, नगरपालिकास्तरावर १६६३, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १९ हजार ७४२ जणांची अशी एकूण २६ हजार ६६४ जणांची आरोग्य तपासणी झाली आहे. २२ हजार १४५ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून अद्यापही ४५१९ जण हे गृह अलगीकरणात वैद्यकीय निरीक्षणात आहेत. त्यात अकोला शहरात ४३६ जण आहेत.