भांबेरी (योगेश नायकवाडे) :- महात्मा फुले जयंती ही आपल्या घरी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी लिहिलेले ग्रंथ, कादंबरी, त्यांचे लिखाण वाचन करून, जातिभेदाचे राजकारण बाजूला ठेवून जयंती साजरी करावी. असे आवाहन महात्मा फुले ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष अजयदादा बंड तसेच तेल्हारा तालुका अध्यक्ष ऋषिकेश निमकर्डे, उपतालुका अध्यक्ष रोशनभाऊ बोंबटकार यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
अधिक वाचा : श्री. गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी 500 खाटांची व्यवस्था, 2 हजार जणांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप
तसेच सर्व महात्मा ज्योतिराव फुले प्रेमींना जाहीर आवाहन केले आहे संपूर्ण जगावर तसेच आपल्या देशावर ज्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून हाहाकार झाला आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे सरकारने जे निर्देश दिले आहेत त्यांचे सर्वांनी पालन करावे. तसेच सर्व फुले प्रेमींनी संध्याकाळी ठीक 7 वाजता 11 दिप प्रज्वलित करून जयंती साजरी करावी.
व्हिडीओ : आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह मा जिल्हाधिकारी यांची माहिती