अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर): कोरोना मुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्याने गोरगरीब गरजू लोकांना प्रशासनासोबत शहरातील सामाजिक संघटना तसेच समाजातील दानशूर व्यक्ती हे स्वतः समोर येऊन मदतीचा हात पुढे करून गरजूंना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत सहकार्यातून सुजानतेचा परिचय देत आहेत. आज अकोट शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये अश्याच गरजू लोकांना नगरसेवक शिवसेना गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांनी गरजू व्यक्तींना गहू वाटून मदत केली आहे. यावेळी सोबत मित्रपरिवारातील सदस्य यांनी सहकार्य केले तसेच पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करा कोणी घरा बाहेर पडू नका ही नम्र विंनती असा संदेश दिला