कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून आरोग्य सेतू नावाचं App लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे App नॅशनल इंफोममेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या App मुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितलं. हे App गुगल प्ले स्टोरवरून तसेच IOS app स्टोर मधून डाऊनलोड केलं जाऊ शकतं.
हे App तुम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे App युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी ट्रेस करतं.
कोरोना व्हायरस विरोधातील या लढाईत जगभरात वेगवेगळे शोध लावले जात आहेत. देशात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाविरोधात पूर्णपणे उतरले आहेत. COVID-19 ला ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळे App विकसित केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना कवच नावाचं App लॉन्च केलं होतं. आता आरोग्य सेतू नावाचं अप सरकारने लॉन्च केलं आहे. हे App कोरोना ट्रेकर App आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही हे तपासू शकता.
आरोग्य सेतू App चा असा करा वापर
- आरोग्य सेतू App वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
- फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
- हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग App आहे
- इंटर झाल्यानंतर App आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.
- आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो
- App उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
- यानंतर App ची भाषा निवडावी लागते
- अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
- आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
- या App मध्ये इस युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.
अधिक वाचा : आपल्याला कोरोना व्हायरस ची लक्षणे जाणवत असतील तर दिलेल्या कोविड-मदद हेल्पलाईनवर फोन करा
काय आहेत खास फीचर्स
आरोग्य सेतु App मध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय.
तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते.
जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.
App डाऊनलोड करताना काळजी घ्या
गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असं टाईप करा. हे App NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवलं आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस App देखील आहेत. त्यामुळं NIC ने पब्लिश केलेलं App च घ्या. किव्हा खालील दिलेल्या लिंक चा वापर करा
Android Link –
https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu&hl=en_IN
Apple IOS App Store Link – https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357