अकोट (प्रतिनिधी शिवा मगर): शासनाने केशरी शिधापत्रिका धारकातील काहींना प्राधान्य गटात समावेश करुन कमी दराने धान्याचा पुरवठा सुरु केला आहे.परंतू अजुनही अकोट तहसिल कार्यालया अंतर्गत 8 ते 10 हजार लाभार्थी या योजने पासुन वंचित आहेत.त्यामूळे कोरोना विषाणु संकटाच्या पार्श्वभूमिवर सरसकट सर्वच केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य पूरवठा करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमूख दिलीप बोचे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. शासनाने केशरी शिधापत्रिका धारकांना 2 रुपये किलो गव्हु व 3 रुपये किलो तांदूळ,आल्पदरात प्राधान्य गटात समावेश असलेल्यांना देन्याचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या निर्णयाचा स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य गटात समावेश झालेल्या लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळत आहे.परंतू अकोट तालुक्यात अजुनही 8 ते 10 हजार लाभार्थी विविध कारणामुळे वंचित आहेत.हे लाभार्थी प्राधान्य गटात समाविष्ट करण्यास पात्र आहेत.परंतू कोटा नसल्याचे सांगुन अनेकदा या लाभार्थ्याचा समावेश करण्यापासुन टाळाटाळ करण्यात आली आहे.सद्या स्थितीत कोरोना विषाणु प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले आहे.अशा स्थितीत शासनाने सरसकट केशरी शिधापत्रिका धारकांना प्राधान्य गटात समावेश करुन लाभ द्यावा.अशी मागणी दिलीप बोचे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली असुन या संधर्भात वरिस्ठ अधिकारी व लोकप्रतीनीधी यांनी पुढाकार घ्यावा.