• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात व्हीआरडीएल लॅब च्या मंजूरीसाठीचा अहवाल दिल्लीकडे रवाना

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Featured, कोविड १९, तंत्रज्ञान, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
vrdl-serology-lab-in-akola
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.८ – कोरोना विषाणू चाचणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आता नमुने तपासणी साठी सज्ज असली तरी त्यासाठी अजून चाचण्यांच्या काही टप्प्यांमधून जावे लागणार आहे, त्यासाठी या प्रयोगशाळेला मंजूरी मिळावी याबाबतचा अहवाल आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेकडे दि.७  (मंगळवार) रोजी पाठविण्यात आला आहे. तथापि प्रयोगशाळेत प्रत्यक्ष चाचणी होण्यास राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे यांचेकडील गुणवत्ता चाचणी ची प्रक्रिया पार केल्यानंतरच विषाणू चाचणीची परवानगी मिळणार आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ. डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले.

या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, या प्रयोगशाळेची निर्मिती ही केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटूंबकल्याण विभाग योजने अंतर्गत विषाणू संशोधन व निदान  प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालयस्तरावर स्थापन करण्यात येत आहेत.  त्याअंतर्गत महाराष्ट्रात सहा ठिकाणी या प्रयोगशाळा उभारण्यात येत असून  त्यातील एक अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येत आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अकोला येथील प्रयोगशाळेसाठी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत २०० चौरस मिटर जागा देण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम हे जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे.आय.सी.एम.आर या संस्थेतर्फे या प्रयोगशाळा  उभारणीसाठी ५० लक्ष रुपये बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी तसेच ९३ लक्ष रुपये  यंत्रसामुग्री, आवश्यक रसायने, किट्स, उपकरणे व फर्निचर यासाठी मंजूर करण्यात आले. या प्रयोगशाळेत  बायोसेफ्टी कॅबिनेट,  लॅमिनर एअर फ़्लो,  ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगर, डीप फ्रिजर इ. आवश्यक साहित्यही प्राप्त होऊन बसविण्यात आले आहे.

कोरोना विषाणू चाचणीच्या अनुषंगाने आवश्यक असलेले आरटीपीसीआर हे मशिन आयसीएमआर या संस्थेतर्फे  मार्च महिन्यात २४ तारखेला प्राप्त झाले आहे. प्रयोग शाळेचे आवश्यक काम दि.३० मार्चला पूर्ण झाले आहे.  प्रयोगशाळेसाठी लागणारे अनुषंगिक यंत्रे, उपकरणे, रसायने इ. प्राप्त झाली आहेत. आता ही प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सज्ज आहे.

या प्रयोगशाळेसाठी आवश्यक सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. याशिवाय प्रयोगशाळेत कामासाठी आवश्यक  रिसर्च सायंटिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदेही नव्याने भरती करण्यात आली आहेत.

प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही टप्पे पुर्ण करावे लागणार आहेत. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रयोगशाळेला मंजूरी मिळवणे याबाबतचा अहवाल आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेकडे दि.७  (मंगळवार) रोजी पाठविण्यात आला आहे.ही मंजूरी मिळताच राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथून तपासणीसाठी आवश्यक प्रायमर, प्रोबस, किट्स पाठविण्यात येतील. त्यानंतर प्रयोगशाळेची गुणवत्ता चाचणी होईल. गुणवत्ता चाचणीच्या मानकाद्वारे गुणवत्ता सिद्ध झाल्यास लगेचच या प्रयोगशाळेस विषाणू चाचणीची परवानगी मिळेल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे यांनी दिली

Tags: corona testing labserologyVRDL Lab akolaव्हीआरडीएल लॅब
Previous Post

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन होणार बाजार समितीचे कामकाज

Next Post

कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात रब्बी पिकांची काढणी, मळणी व मळणी पश्चात व्यवस्थापन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
rabi-crops

कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात रब्बी पिकांची काढणी, मळणी व मळणी पश्चात व्यवस्थापन

आपल्याला कोरोना व्हायरस ची लक्षणे जाणवत असतील तर दिलेल्या कोविड-मदद हेल्पलाईनवर फोन करा

आपल्याला कोरोना व्हायरस ची लक्षणे जाणवत असतील तर दिलेल्या कोविड-मदद हेल्पलाईनवर फोन करा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.