अकोला- जिल्ह्यात बाहेरील राज्यातुन वा जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची संख्या त्ब्बल २५ हजार ९८३ इतकी आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रशासनाच्या संपर्कात आले आहेत. त्यातील १३ हजार ४८ जणांचे वैद्यकीय तपासणी नंतरचे गृह अलगीकरणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित १२ हजार ९३५ अद्यापही गृह अलगीकरणात आहेत.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, एकट्या अकोला शहरात बाहेर गावाहून ५०३६ जण दाखल झाले. जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रात १६६३ लोक आलेत. तर ग्रामिण भागात ज्यांची वैद्यकीत तपासणी ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत करण्यात आली अशांची संख्या ही तब्बल १९ हजार २८४ इतकी आहे. असे जिल्ह्यात एकूण २५ हजार ९८३ लोक बाहेर गावाहून आलेले आहेत. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपुर, यवतमाळ अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व लोकांना आरोग्य तपासणीनंतर गृह अलगीकरण करुन समाजात न मिसळण्याचा सल्ला दिला होता.
त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरीय समितीही तयार करण्यात आली आहे. अद्याप १३ हजार ४८ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १२ हजार ९३५ लोक अद्यापही गृह अलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे अकोला मनपा क्षेत्रात दाखल झालेले ५०३६ जणांचा सगळ्यांचाच १४ दिवस अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात १६६३ जण बाहेरुन आले आहेत. त्यातील १०९८ जणांचा १४ दिवसांचा गृह अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ५६५ जण सध्या अलगीकरणात आहेत. ग्रामिण भागात १९ हजार ४०२ जण आलेले आहेत, त्यातील ९४१३ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे तर ९८७१ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत.
अधिक वाचा: कारागृहातला भाजीपाला अन्नछत्रांसाठी