अकोला- तुरुंगात असणारे बंदिवान. त्यांनाही कुटूंब असतं. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ते भोगत असतांना त्यांच्या कुटूंबियांना जीवन जगतांना कोणताही त्रास होऊ नये याचीही दक्षता तुरुंग प्रशासन घेत असते. सध्या देशभरात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे परिस्थिती वेगळी आहे.
तुरुंगातील कैदी हे बंदिवासात असले तरी त्यांच्यापैकी अनेकांच्या कुटुंबांचा रोजगार, आणि दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहेच. त्यातील अनेक जण मोल मजूरी करणारे. लॉक डाऊन मुळे त्यांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी कारागृह अधिक्षक ए.एस.सदाफुले यांनी तुरुंगातील कैद्यांमधून ज्यांच्या कुटूंबियांबाबत प्रश्न निर्माण झालाय त्यांची यादी तयार केली.
त्यांच्या घरातील कमावते लोक किती? कोण.
अवलंबित किती याची माहिती घेण्यात आली. ही संख्या ३१ पर्यंत पोहोचली. ही माहिती वऱ्हाड सामाजिक संस्था आणि समता फाऊंडेशन या संस्थांना देण्यात आली. या संस्थांमार्फत या कुटूंबियांना किराणा माल व दैनंदिन उपयोगाच्या वस्तू पाठविण्यात येत आहेत. या संस्थांमार्फत या कुटूंबियांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची गरज भागविण्यात येत आहे.
अधिक वाचा: कारागृहातला भाजीपाला अन्नछत्रांसाठी