अकोला– जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) आणखी ९ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ७८ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ५३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. तर २५ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात अकोला जिल्हातील १३
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून १९४ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ४८ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर १११ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.