• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

श्रमिक हो घ्या इथे विश्रांती…! अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा

Team by Team
May 6, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती…! अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवितांना जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे आपापल्या गावी न जाऊ शकलेले श्रमिक कामगार मोठ्या संख्येने अडकले वा प्रवासात राहिले, ते सारे अकोला जिल्ह्याच्या आश्रयात आले. सध्या २००७ इतक्या संख्येने हे श्रमिक अकोला जिल्ह्यात आश्रयस्थानी आहेत. शासन त्यांचे निवास, भोजन आदी दैनंदिन सुविधा देत आहे. सध्या तरी हे श्रमिक इथं विश्रांती घेतांना दिसत आहेत.

हैदराबाद येथून २४ मार्चपासून मजलदरमजल करीत सुमारे ६० कामगारांचा एक जत्था मध्यप्रदेशातील मुरेना जिल्ह्याकडे जात होते. अकोला जिल्ह्याच्या सिमेवर सिमाबंदी असल्याने त्यांना २९ मार्चला पातूर येथे अडविण्यात आले. तेथून त्यांना अकोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

येथे त्यांच्यासाठी उत्तम निवास, झोपण्याची सुविधा, पाणी, दिवाबत्ती इतकेच नव्हे तर हे श्रमिक मिळेल तसे निघाले असल्याने अनेकांकडे कपडेही नव्हते तर त्यांना इथं कपडेही देण्यात आले. या शिवाय दैनंदिन लागणाऱ्या वस्तू जसे टुथपेस्ट, ब्रश,साबण, डोक्याला लावण्याचे तेल इ. सर्व साहित्यही पुरविण्यात आले. सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना या भवनात ठेवण्यात आले आहे. इथं त्यांना दोन वेळ जेवण, नाश्ता,चहा इ. सर्व सुविधा दिल्या जातात.

याठिकाणी आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. इथली सुविधा अत्यंत उत्तम आहे. आमची चांगली सोय ठेवल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासन आणि अकोला जिल्हा प्रशासनाचे आभारी आहोत,असे दुर्गाप्रसाद कुशवाह या नंदुकापुरा ता. केलारस, जि. मुरेना यांनी सांगितले.

आम्हाला आमच्या घरी जाण्याची ओढ ही आहेच. आम्हाला इथं आणल्यानंतर असे वाटत होते की आता आम्हाला कसे ठेवले जाणार? पण इथ खूपच चांगली सोय आहे. उत्तम जेवण राहण्याची सोय केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत, असे लखन प्रजापती खेरली ता. संबरगढ, जि. मुरेना हेम्हणतात.

तर सत्यवान कुशवाह नंदुकापुरा ता. केलारस, जि. मुरेना यांनी सांगितले की, आम्हाला एकदम चांगली सुविधा मिळाली आहे, इथले अधिकारी आमच्याशी खूप आपुलकीने बोलले आमची विचारपूस केली, आमचे जेवण , राहणे या सगळ्याची चांगली व्यवस्था केली. इतकेच काय आमची तपासणी सुद्धा केली.

कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारे भय, त्यात कुटूंबियांपासून दूर असल्याने झालेली भितीची छाया अधिकच गडद. या अशा वातावरणात ते इथं आले. कुणी पायपीट करत तर कुणी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात मध्यवर्ती असणाऱ्या अकोला जिल्ह्याच्या सिमेवर प्रशासनाच्या ताब्यात आले. कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध घालावा या एकमेव हेतूने त्यांना इथं अडवण्यात आलं. इथं ते अडविण्यात आले ते कुणी गुन्हेगार म्हणून नाही तर आश्रीत म्हणून. त्या साऱ्यांची जबाबदारी ही प्रशासनाने घेतली. अकोला जिल्हा प्रशासनाच्या टिमने या सर्व अडकलेल्या श्रमिकांची विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. सध्या जिल्ह्यात २००७ जण आश्रयाला आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी आश्रयाला असलेल्यांची ठिकाणांसह माहिती याप्रमाणे कंसात आश्रीतांची संख्या दिली आहे. सध्या एकट्या अकोला शहरात खडकी(३२७), डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन (६०), शिवनी शिवार (२८), निरघाट(१७०), उगवा (१३०), दहीहंडा(५५), भारीखेड(४९), डाळंबी(३४), चांडक लेआऊट खडकी(६८), दोंदवाडा(४४), अष्टविनायक नगर खडकी(२७), गोरेगाव खुर्द(२२), माझोद(२१), महसूल कॉलनी खडकी(२१), कोठारी वाटीका(२०), अग्रवाल शेल्टर हाऊस(६५) या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कान्हेरी सराफ ता. बार्शी टाकळी, कंपनी शेल्टर हिवरखेड ता. अकोट (२८३), तेल्हारा (२७०), रिधोरा ता. बाळापूर (५१), नगरपालिका हॉल पातूर (५१), गुरुद्वारा लंगर पारस फाटा ता. बाळापूर (२२), राठोड माध्यमिक विद्यालय दहातोंडा ता. मुर्तिजापूर (१२०), मुर्तिजापूर (३८) असे एकूण २००७ जणांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने १२२ आंध्रप्रदेशातील, ४७ बिहार, सहा छत्तीसगड,८० गुजराथ,९७ झारखंड, ५० केरळ, ११०९ मध्यप्रदेश, पाच पंजाब, ६५ राजस्थान, ५३ तामीळनाडू, २०२ तेलंगाणा, ४९ उत्तरप्रदेश, एक उत्तराखंड,१ पश्चिम बंगाल, १२० हे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील आहेत.

या सर्व जणांना राहण्याची सोय, सकाळी शौचालय, आंघोळीची सोय, पिण्याचे पाणी, दोन वेळचे जेवण तसेच आवश्यकता भासल्यास वैद्यकीय तपासणी व उपचार, आपल्या गावाकडील कुटूंबियांशी संपर्कासाठी दूरसंचार सुविधा या सुविधा दिल्या जात आहेत. शासनाने दिलेल्या सुविधांमुळे त्यांच्या आयुष्यातला हा खडतर कालावधी सुसह्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने काही ठिकाणी कम्युनिटी किचनद्वारे तर काही ठिकाणी सेवाभावी संस्थांद्वारे जेवणाची सोय केली आहे. जरी गावाकडे पोहोचण्याची आस असली तर हा मुक्काम सुसह्य असल्याचे त्यांच्या थकल्या भागल्या चेहऱ्यावरुन जाणवत होते.

Tags: Akolanewsअकोला जिल्हादुर्गाप्रसाद कुशवाह
Previous Post

वाशिममध्ये कोरोना पॉझीटीव्ह, तबलिगी जमातीच्या संमेलनात हजेरीची शक्यता

Next Post

कोरोना अपडेट : ७८ पैकी ५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह; २५प्रलंबित

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola-corona-update-3-april-2020

कोरोना अपडेट : ७८ पैकी ५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह; २५प्रलंबित

धान्य वाटपाबाबत पुरवठा विभागाचे दिशानिर्देश

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पात्र लाभार्थ्यांना तांदुळ वितरणास प्रारंभ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.