तेल्हारा(किशोर डांबरे): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून रुग्णाची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाकडून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.अशातच तेल्हारा तालुका प्रशानाचे सर्वोसर्वा जबाबदारी असलेले तहसिलदार सुरडकर यांनी किराणा असोसिएशन यांची बैठक घेऊन सूचना दिल्या .
शुभ वर्तमानः दाखल शून्य, रुग्ण शून्य,अकोलेकरांना घरात थांबण्याचे आवाहन
यामध्ये तहसीलदार यांनी किराणा दुकानांमध्ये होणारी गर्दी पाहता व ती टाळण्यासाठी पाऊल उचलले असून तेल्हारा किराणा असोसिएशन च्या पदाधिकारी यांना सूचना दिल्या की शक्य झाल्यास लोकांना घरपोच किराणा द्यावे लोकांना याबाबत माहिती देऊन सामानाची लिस्ट मोबाईलद्वारे बोलावून सामानाची डिलिव्हरी घरपोच करावी असे आदेश तहसीलदार यांनी तेल्हारा किराणा असोसिएशन यांना दिले.मात्र अद्याप ही सुविधा सुरू होईपर्यंत किराणा दुकान आपल्या वेळेवर सुरू राहणार आहेत.