अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सुरु असलेल्या संचार बंदी कालावधीत पतसंस्थांचे कामकाज सुरु राहिल,असे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात पतसंस्था सुरु ठेवाव्या की नाही याबाबत जारी निर्देशाबाबत संस्थाचालकांकडून विचारणा होत होती. मात्र लॉक डाऊन मधून वित्तीय संस्थांना वगळले असल्याने व पतसंस्थाही वित्तीय संस्था असल्याने त्या सुरु ठेवाव्यात . ग्रामिण भागात सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून पतसंस्था सुरु राहणे गरजेचे आहे. तथापि पतसंस्थांनी कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावयाचे आहे. तसेच संस्थेत कमीत कमी कर्मचारी उपस्थित ठेवावयाचे आहेत. कामकाज करतांना साबणाने हात धुणे, संस्थेत लोकांच्या प्रवेशावेळी सॅनिटायझरचा वापर, गर्दी होऊ न देणे याबाबत खबरदारी घ्यावी असे निर्देशही दिले आहेत.