तेल्हारा (किशोर डांबरे)- सर्वीकडे कोरोना ने दहशत माजवली असतांना तसेच शासनाने जमाव बंदीचा आदेश काढला असून तेल्हारा शहरात याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी हजारो रुपयांच्या मालावर डल्ला मारला.
संपूर्ण जगात कोरोना या रोगाने दहशत माजवली असुन शासन हा रोग आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाय योजना करीत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जमाव बंदी आदेश काढला असुन पाच पेक्ष्या जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी केली, असुन संपूर्ण शहर हे निरमनुष्य झालेले असतांना चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत स्थानिक मुख्य मार्केट असलेले तसेच बस स्थानका समोरील राधिका किराणा येथें मध्यरात्री किराणा दुकानातील मुद्देमाल तसेच हजारो रुपयाची नगद राशी असा जवळपास अंदाजे ८० ते ९० हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या वेळेस चोरट्यांनी शटर चे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून सदर मुद्देमाल लंपास केला.
तसेच काही अंतरावर असलेलं दुर्गा मेडिकल येथे सुद्धा चोरट्यांनी डल्ला मारुन जवळ पास सहा ते सात हजाराचा नगद मुद्देमाल लंपास केल्याचे सांगितले. या वेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. तसेच चोरट्याचा थांगपत्ता लागावा म्हणुन शहरातील सी सी टी व्ही फुटेज ची तपासणी पोलीस करीत आहेत. एकीकडे कोरोना या रोगामुळे संचारबंदी लागू केल्याने पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतांना चोरीच्या घटनेने पोलीसांचा ताण मात्र वाढविला.