तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोना या रोगाने जगभरात दहशत माजवली असतांना महाराष्ट्र शासनाने रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात कलम १४४ लागू केली. मात्र तेल्हारा येथील काही बहादराणी जमावबंदीचा आदेश झुगारून खुल्या जागेत जुगार खेळणे चालु असतांना तेल्हारा पोलिस पेट्रोलिंग करताना त्यांना आढळून आले. असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात येऊन अटक करण्यात आली.
कोरोनो या रोगाने संपूर्ण जगात दहशत माजवली असून प्रशासन या रोगाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन असून रोगाला आळा बसावा म्हणून योग्य त्या उपाययोजना राबवित आहे. अशातच शासनाने काल सायंकाळ पासून कलम १४४ लागू केली असून पाच किंवा पाच लोक एकाजागी जमावबंदी असून पोलीस विभाग अशा बाबत पेट्रोलिंग करून जमावबंदीस झुगारून लावत आहे. आज सकाळी अशाच बाबतीत पेट्रोलिंग करीत असताना शहरातील इंदिरा नगर मधील खुल्या जागेत जमावबंदीचा आदेश झुंगरून जुगार खेडताना पोलिसांना आढळल्याने पोलिसांनी कारवाई करीत अटक केली.
यामध्ये आरोपी रमेश रामकृष्ण नगरे, वय -52
विशाल गोविंद रोंदलकर, वय -29
रणवीर विष्णु इंगले, वय -23
निनुदिन्न इब्रमुदिन्न शेख, वय- 50
अरुण पुरुषोत्तम इंगले, वय -35 सर्व राहणार इंदिरा नगर यांच्याजवळून ९६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध कलम १८८, १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे, पो कॉ खडसे, पिंजरकर, ठाकूर, सांगे यांनी केली.