वाडेगाव( डॉ .शेख चाँद) – बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सोमवार दुपारी ४ वाजताच्या सुमारास चक्रीवादळा वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यामुळे सिद्धार्थ नगर, झोपडपट्टी,इंदिरा नगर , बाळापूर वेस, तसेच संपुर्ण वाडेगाव परीसरातील अनेक ग्रामस्थाच्या घरावरील, हॉटेल वरील, टिनपत्रे उडून गेली तर काहीच अतोनात नुकसान झाले आहेत. यामध्ये ग्रामस्थ भयभीत होऊन जीवाचा अंकात ने स्वतःचा जीव मुठीत धरून लपण्यासाठी जागा शोधत होते. या मध्ये संसार उघड्यावर पडले असून लहान बालक सह नागरिक भयभीत झाले आहेत. या घरांची पडझड झाली आहे. आज रोजी सर्वांचे घर उघड्यावर पडले आहेत.
तसेच परिसरात शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुसकान झाले असून शेतकऱ्याच्या लिंबू पिकाची आलेला फळ गळून खाली पडले आहेत. लिंबुची झाडे उपटल्या गेली आहे. सोगुण ठेवलेला हरभरा ओला होऊन वादळाने दानफाण झाला आहे. तर गहू पीक झोपला असून आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे .परिसरात असा वादळ वारा अवकाळी पाऊस पहिल्यादा झाला असल्याचे ग्रामस्थध्ये चर्चा आहे. यासोबतच घरामधील साहित्य धान्य काचेचे भांडे पंखा, फ्रिज, टी व्ही, आधी साहित्य फुटून मोठे नुकसान झाले.
या वादळ मध्ये रस्त्यालगत असलेली निंबाचे,बाबळी चे तसेच शेतातील झाडे विद्युत खांबावर पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तसेच देगांव रोड वर असलेल्या कोल्हापुरी बंधारा गोडाउन जमीनदोस्त झाला. गावातील अनेक दुकान चे नुसकान झाले आहे दुकानांमध्ये लाखो रुपयाची साहित्य फुटले आहेत याबाबत तहसीलदार यांनी सर्व संबंधीत कर्मचाऱ्यांना, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, इत्यादींना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0