तेल्हारा(प्रतिनिधी)- स्थानिक राष्ट्रीय भवनातील सार्वजनिक मैत्रिय वाचनालयात महिला बालकल्याण सभापती सौ सीमा पिवाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रमाबाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हारापर्ण करून विनम्र अभिवादन केले त्यानंतर ग्रंथपाल रामेश्वर पोहेकर यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले व वाचनालय तर्फे सर्व उपस्थित महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला रीना सोळंके,प्रीती पोटे,रेवती गढे, शीतल बोदडे, जिया पोटे यांच्यासह विद्यार्थी,वाचक,सभासद, ग्रंथप्रेमी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते,यावेळी संचालन अशोक रायबोले यांनी तर आभार रामचंद्र पवार यांनी केले.