हिवरखेड (प्रतिनिधी) – हिवरखेड परिसरात वैध आणि अवैध दारूचा महापूर आला असून दारू पिण्यास पैसे न दिल्याने युवकावर कुऱ्हाडीने हमला करण्याची घटना हिवरखेड येथे घडली आहे.
सविस्तर असे की फिर्यादी जाहिद खा फरहादउल्ला खा वय 20 वर्ष राहणार स्वस्तिक कॉलनी हिवरखेड यांनी हिवरखेड पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी तसव्वर खा जाबीर खा, अजहरुद्दिन नईमुद्दीन, मुजम्मिल खान मिराज खान या तीन आरोपींवर हिवरखेड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324, 504, 506, 34 इत्यादी कलमांव्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. आरोपींना तेल्हारा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
सविस्तर असे की फिर्यादी जाहिद खा हा (इंदिरा नगर) भाऊदेवराव गिर्हे नगर हिवरखेड येथून घरी जात असताना त्याच्या भावासोबत तसव्वर खा जाबीर खा हा वाद घालत असल्याचे दिसून आला. आणि दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. तेव्हा जाहिद खा हा तसव्वर ला समजावत असताना उपरोक्त तिन्ही आरोपींनी संगणमत करून आणि तसव्वर खा ह्याने कुर्हाडीने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले तसेच मजहरोद्दीन याने फिर्यादीचा भाऊ दिलावर खा याच्या डोक्यावर काठीने मारून जखमी केले.
हिवरखेड पोलिसांचे अभय?
दारू, वरली, मटका, पत्यांचे क्लब, गौवंश कत्तल, गौण खनिज तस्करी, सागवान तस्करी इत्यादी अवैध धंद्यांना अनेक वर्षांपासून प्रचंड उत आला असून ह्या सर्व अवैध धंद्यांना हिवरखेड पोलिसांचे आणि संबंधित यंत्रणांचे अभयदान असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे याला कारण ही तसेच म्हटल्या जाते.
काही दिवसांपूर्वी तुषार पुंडकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिवरखेड अकोट तेल्हारा इत्यादी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ह्यावेळी साधारण दुकाने 100 टक्के बंद असतानाही वरली मटक्या वाले मात्र पोलिसांच्या आशीर्वादानेच भरचौकात बेधडकपणे आपल्या चिठया भरण्याचा धंदा अविरतपणे खुल्लेआम चालवीत असल्याचे नागरिकांना स्पष्ट दिसत होते. ह्या अवैध धंदेवाल्यांचे मनोबल इतके वाढलेले आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही खालपासून वरपर्यंत सर्व संबंधितांना मुबलक प्रमाणात रसद पुरवीत असल्याने कोणीही आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. मध्यंतरीच्या काळात अवैध धंद्यांच्या बातमीबाबत कर्तव्यदक्ष पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार ही घडले आहेत पण पत्रकारांनी तक्रार देण्याचे टाळले.
हिवरखेड पोलिसांनी स्वार्थ सोडून वेळीच ह्या प्रकारांना आवर न घातल्यास कोणतीही मोठी अनुचित घटना घडल्यास त्याला सर्वस्वी हिवरखेड पोलिसांना जवाबदार धरण्यात यावे असे सुजाण नागरिक आपसात चर्चा करीत आहेत.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.