तेल्हारा दि :- स्थानिक वैकुठंधामची झालेली दुर्दशा व होत असलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी तेल्हारा शहरातील नागरिकांनी २४ फेब्रुवारी ला मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सुध्दा आरोप करण्यात आला आहे.
तेल्हारा शहरामध्ये असलेले वैकुंठधाम हे सुरुवातीला झाले तेव्हा दर्शनीय स्थळात विदर्भातून दोन नंबरवर सुव्यवस्था व देखावा, साफसफाईच्या बाबतीत नावाजले होते. दूरदुरून नागरिक वैकुंठधाम पाहण्यासाठी येत होते. परंतु, दुर्दैव्याने गेल्या काही दिवसापासून या स्मशानभूमीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. याकडे प्रशासन अथवा पदावर असलेले स्थानिक लोक प्रतिनिधी लक्ष देत नसल्याने येथील बगीच्या, मूर्ती, लॉन, झाडे, भिंती, प्रेत जाडण्याचे कटघरे इत्यादींची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने आलेला निधी वरच्यावर गहाळ होत आहे, वृक्षरोपणाकरिता आलेला निधी, रंगरंगोटीचा निधी, देखभालीचा निधी लाखो रुपये येवून सुद्धा याचा वापर होत नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच निकृष्टदर्जाचे सुरु असलेल्या कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाही करावी. तसेच वैकुंठधामाची पंधरादिवसात लवकरात लवकर दुरुस्ती करावी व नवीन कठडे लावण्यात यावे. अन्यथा आम्ही भिकमांगो आंदोलन करून येणारी भिक आपणास वैकुंठधामाच्या दुरुस्तीसाठी सुपूर्द करू.अश्या प्रकारचे निवेदन नागरिकांनी देऊन नगर पालिकेला ईशारा देण्यात आला आहे .निवेदनावर विशाल नांदोकार, पुरुषोत्तम जायले,गौरव धुळे,चंद्रकांत खाडे,सुरज साळुंके,रुपेश चव्हाण,अक्षय कापसे
,गणेश आमटे,अनंत सोनमाळे ,शिवा खाडे ,प्रवीण ढोके, संजय मंगळे,वैभव मानकर ,शंकर इंगोले, गजानन वानखडे,गणेश सोनोने ,शुभम चौहान ,सचिन सपकाळ, श्रीकृष्ण खाडे ,गोपाल जायले इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.